Categories: Uncategorized

रुग्णवाहिका चालकांना विनाकारण सायरन वाजवण्यास मनाई करण्याची मागणी

राजेंद्र पाटील : ९९६७२८५६१८

पनवेल : कोरोना महामारीच्या काळात सर्व स्तरातील नागरिक प्रचंड मानसिक तणावाखाली वावरत आहेत. त्यामुळे आसपास घडणाऱ्या अकल्पनीय घडामोडींमुळे मनात भीतीचे सावट निर्माण झाले आहे. अशातच अचानक येणारा रुग्णवाहिकेच्या सायरनचा आवाज हा अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवत असून नागरिकांच्या मानसिक संतुलनासाठी ते घातक ठरत आहे. रुग्णवाहिका चालक विनाकारण सायरन चालू ठेवत असल्याचे आढळून येत असल्याने या प्रकाराला आळा घालण्यासाठी महानगरपालिकेच्या प्रभाग समिती ब चे सभापती नगरसेवक संजय भोपी यांनी आयुक्तांना ई-मेल द्वारे निवेदन दिले आहे. 

           जागतिक महामारीच्या आव्हानात्मक काळात नागरीक  कोरोना या रोगाचा निकराने सामना करत आहेत या परिस्थितीत प्रशासन आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी म्हणून नागरिकांच्या रक्षणार्थ कोरोनाविरोधात लढा देत आहेत. नागरिकांच्या आरोग्य सोबतच मानसिक आरोग्याची देखील काळजी घेणे सद्यस्थितीत गरजेचे झाले आहे.  सध्याच्या लॉकडाऊन मुळे रस्त्यावर वाहनांची वर्दळ असताना देखील रुग्णवाहिका चालक विनाकारण सायरन चालूच ठेवत असल्याचे समोर आले आहे. वास्तविक पाहता रुग्णवाहिकेच्या मार्गात अडथळा निर्माण होत असल्यास सायरन वाजवणे अभिप्रेत आहे. मात्र परिसरात तसे होताना दिसून येत नाही. या आवाजामुळे नागरिकांच्या मनातील भीती अधिकच वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विनाकारण सायरन वाजवण्यास मनाई करण्याची मागणी संजय भोपी यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago