Categories: Uncategorized

राहूल गांधींना झालेल्या धक्काबुक्कीचे नवी मुंबईत उमटले पडसाद

कॉंग्रेस प्रवक्ते रवींद्र सावंत यांचा सायन-पनवेल हायवेला ‘रास्तारोको’

Navimumbailive.com@gmail.com- ९८२००९६५७३

नवी मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या धक्काबुक्कीचे पडसाद नवी मुंबईत उमटले. नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते व नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी कॉंग्रेसच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसमवेत सायन-पनवेल महामार्गावर काही काळ ‘रास्ता रोको’ करत वाहतुक अडविली.

काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या धक्काबुक्कीचे वृत्त नवी मुंबईत पसरताच कॉंग्रेस  कार्यकर्ते व  पदाधिकाऱ्यांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. कॉंग्रेस  कार्यकर्ते व  पदाधिकारी हे नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते रवींद्र सावंत यांच्या नेरूळ येथील कार्यालयाजवळ जमू लागले. कोरोना संकट पाहता निवडक कार्यकर्ते व पदाधिकारी  घेवून रास्ता रोको करण्याचा निर्णय रवींद्र सावंत यांनी घेतला. सांयकाळी ६ वाजण्याच्या सुमारास रवींद्र सावंत जुईनगर-शिरवणे येथील सायन-पनवेल महामार्गावर कॉंग्रेसच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसमवेत उतरले. पनवेलहून सायनच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी काही काळ वाहतुक अडविली. कॉग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी घोषणाबाजी करत उत्तर प्रदेशातील घडलेल्या घटनेचा निषेध करत कॉंग्रेस जिंदाबादचा सतत नारा देत होते.  सांयकाळची रहदारीची वेळ व त्यात कॉंग्रेसचे ‘रास्ता रोको’ यामुळे लांबवर वाहतुक कोंडी झाली.

नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते व नेरूळ तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांच्या नेतृत्वाखालीनेरूळ तालुका कॉंग्रेसचे उपाध्यक्ष प्रल्हाद गायकवाड, दिनेश गवळी, फारूक अत्तार, कॉंग्रेसच्या नवी मुंबई जिल्हा सचिव विद्या भांडेकर, शेवंता मोरे, बबीन मॅथ्यू व विजय पगारे, राहुल कापडणे, तुकाराम महाराज, विनय कांबळे, आदित्य सूर्यवंशी, श्रीराम पंधिरे, संग्राम इंगळे, सुरेश सदावर आदींनी रस्त्यावर उतरून कॉंग्रेस जिंदाबादच्या घोषणा देत वाहतुक अडवून धरली. राहूल गांधी व प्रियंका गांधींना उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या धक्काबुक्कीच्या निषेधार्थ रवींद्र सावंत व  सहकाऱ्यांनी केलेल्या रास्ता रोकोची कॉंग्रेसच्या प्रदेश पातळीवरही दखल  घेण्यात आली  आहे.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago