Categories: Uncategorized

राजीव गांधी उड्डाण पुल ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पादचारी पुलापर्यतच्या परिसरात तुटलेल्या संरक्षक भिंतीची डागडूजी करा : सौ. सुनिता रतन मांडवे

स्वयंम न्युज ब्युरो : ९८२००९६५७३ :Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई :  महापलिका प्रभाग ८७ मध्ये नेरूळ सेक्टर ८ राजीव गांधी उड्डाण पुल ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पादचारी  पुलापर्यतच्या परिसरात  रेल्वे रूळालगतची तुटलेल्या संरक्षक भिंतीची डागडूजी करण्याची मागणी शिवसेनेच्या माजी नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून बुधवारी (दि. ४ नोव्हेंबर) केलीआहे.

महापालिका प्रभाग ८७ मध्ये नेरूळ सेक्टर ८ मधील राजीव गांधी उड्डाणपुलापासून ते नेरूळ सेक्टर १० मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पादचारी पुलापर्यत असलेली रेल्वे रूळालगतची संरक्षक भिंत ठिकठिकाणी तुटलेली आहे. काही ठिकाणी भिंतीला भगदाडही पडलेले आहे. या ठिकाणी गर्दुले, अन्य व्यसनी लोकांचा वावर त्या ठिकाणी वाढलेला आहे. तुटलेल्या संरक्षक भिंतीमुळे त्या ठिकाणी वाढीस लागलेल्या समाजविघातक प्रवृत्तींकडून त्या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या महिला वर्गाची छेडछाड  अथवा  अन्य दुर्घटना  होण्याची भीती आहे. महापालिका प्रशासनाने लवकरात लवकर त्या संरक्षक भिंतीची डागडूजी करावी, संबंधितांना तसे निर्देश द्यावेत अशी मागणी शिवसेनेच्या माजी नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी केली आहे.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago