Categories: Uncategorized

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला नवी मुंबईतील विकास कामांचा आढावा

मुंबई : नवी मुंबईतील विविध विकास कामांचा आढावा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. पाम बिच ट्रॅक, ज्वेल ऑफ नवी मुंबई, गवळ देव वन पर्यटन प्रकल्प, ऐरोलीतील धर्मवीर आनंद दिघे मैदान या सारखे प्रकल्प लवकरात लवकर पुर्ण करुन नागरिकांना त्याचा लाभ द्यावा असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
या बैठकीस नगरविकास मंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. राजीव, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर आदी उपस्थित होते.
नवी मुंबईतील घनसोली येथे राखीव भुखंडावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्पोर्टस कॉम्प्लेक्स बांधण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. यासंदर्भातील तांत्रिक बाजू पूर्ण करुन नवी मुंबई महापालिकेने सिडकोकडे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
नवी मुंबईला जोडणारा आणि ठाणे-बेलापूर रस्त्याला पर्यायी ठरणारा कोस्टल रोडला जोडणाऱ्या प्रकल्पाच्या कामाबाबत यावेळी चर्चा झाली. संपुर्ण नवी मुंबई विमानतळ आणि इतर शहरांना जोडणारा कोस्टल रोड हा प्रकल्प पूर्ण झाल्यास त्यामुळे वाहतूकीचा ताण कमी होईल, असे नगरविकास मंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.
घनसोली, ऐरोली उर्वरित रस्त्यावर खाडीपुल बांधण्याबाबतच्या प्रकल्पाचा आढावा यावेळी घेण्यात आला. या संदर्भात सिडको आणि नवी मुंबई महापालिका या दोन संस्थांनी समन्वयातून तांत्रिक बाबी पूर्ण कराव्यात असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. हा महत्वाचा प्रकल्प असून प्रलंबित रस्ता पूर्ण झाल्यास नागरिकांना दिलासा मिळेल. सीआरझेड आणि कांदळवन महत्वाचा विषय असून कांदळवन सुरक्षित ठेऊन पुढे जाता येईल अशा पद्धतीने काम करण्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
ऐरोली येथील सागरी जैवविविधता केंद्राचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी वन विभागाच्या माध्यमातून प्रयत्न करावा असे त्यांनी यावेळी सांगितले.
तुर्भे रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या सेक्टर २० मधील भुयारी मार्गाचे काम एमएमआरडीएच्या माध्यमातून करण्यात यावे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात गवळ देव ते सुलाई देवी वन पर्यटनस्थळाला निधी द्यावा. रोपवेची आवश्यकता आहे का याची तपासणी करावी, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी कळवा ऐरोली एलिव्हेटेड प्रकल्प, नवी मुंबईतील भुमिपुत्रांचे प्रलंबित प्रश्न याबाबत चर्चा झाली. या संदर्भात सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांसोबत बैठक घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
नवी मुंबईतील १३ रेल्वे स्थानके सिडकोने बांधली आहेत. त्या ठिकाणी लिफ्ट आणि सरकते जिने करण्यासाठी सिडकोने पुढाकार घेण्याबाबत खासदार विचारे यांनी मागणी केली.यावेळी नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी नवी मुंबईच्या महत्वांच्या प्रकल्पांबाबत सादरीकरण केले.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago