Categories: Uncategorized

मालमत्ता कर माफ करा! अत्यावश्यक सेवेतील कोविड रूग्ण इथलेच नागरिक, करदाते

राजेंद्र पाटील : ९९६७२८५६१८

 पनवेल : कोविड साथीरोगाच्या पार्श्‍वभूमीवर अत्यावश्यक सेवा बजावणार्‍यांना कोविड रूग्णांना महापालिका, नगर पालिका, नगर पंचायती आणि ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींनी पुढील पाच वर्षांसाठी सर्व प्रकारच्या करांसह मालमत्ता कर माफ करावे, अशी मागणी करून सर्वांनी सामाजिक बांधिलकी जपून प्रशासनाला पत्रव्यवहार करून कोविड रूग्णांचे प्रत्यक्षात मनोबळ वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी केली आहे.
 
पनवेल महापालिका क्षेत्रातील शहरांमध्ये अथवा ग्रामीण भागातील रहिवाशी असलेल्या नागरिक बांधव मुंबई महापालिका, पोलिस दल, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पुणे, वर्स-विरार आदी भागात शासनाच्या अत्यावश्यक सेवेत कार्यरत आहेत. त्यांना कोणत्याच आस्थापनेने फारशी व्यवस्था केलेली नसताना, ते कर्तव्यात कुठेही कसुर करत नाहीत. तरीही त्यांची व्यवस्था कामाच्या ठिकाणी करावी, असा विरोधी सूर लावून एकप्रकारे त्यांची हेटाळणीच काही राजकीय नेत्यांनी केली आहे. त्यातून त्यांचे आणि कुटूंबाचे खच्चीकरण होत आहे.
 
विशेष म्हणजे पनवेल महापालिका क्षेत्रात राहणारे नागरिक इतर आस्थापनात कोविडमध्ये अत्यावश्यक सेवा बजावत आहेत. तसेच पनवेल महापालिका आणि इतर आस्थापनात सेवा करणारे इतर महापालिका क्षेत्रात राहत आहेत. त्यांची इथे काहीच व्यवस्था काय केली गेली नाही, मग इतरांकडे बोट दाखविण्याचे राजकारण कशासाठी खेळले जात आहे, असा प्रश्‍न कडू यांनी उपस्थित केला आहे.
 
वास्तविक ते शहरातील रहिवाशी असून त्यांनी कर्ज काढून घरे घेतली आहेत. ते सोसायटीचे विविध करही देत आहेत. शिवाय महापालिका, ग्रामपंचायतीला कर भरत आहेत. त्याबदल्यात त्यांना आजच्या कोविडच्या पार्श्‍वभूमीवर आपण कोणतीच विशेष मदत केलेली नाही. अशा स्थितीत त्यांच्यासोबत राहण्याऐवजी त्यांना एकप्रकारे कट कारस्थानाच्या व्युहरचनेद्वारे बाहेर काढण्याचे उपद्व्याप काही राजकीय नेते करीत आहेत. अशा परिस्थिीत सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांनी अत्यावश्यक सेवेतील कोविड योद्ध्यांचे मनोबळ वाढून त्यांना आत्मसन्मान मिळावा म्हणून महापालिका, ग्रामपंचायतीने पाच वर्षाचे मालमत्ता कर माफ करण्याची मागणी केली आहे.
 
शिवाय समाजातील सर्व लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते यांना आवाहन करून प्रशासनाशी यामागणीसदर्भात पत्रव्यवहार करून कोविड योद्ध्यांची सेवा करण्याची विनंती केली आहे.
 
विशेष म्हणजे पनवेल महापालिका क्षेत्रात राहणारे नागरिक इतर आस्थापनात कोविडमध्ये अत्यावश्यक सेवा बजावत आहेत. तसेच पनवेल महापालिका आणि इतर आस्थापनात सेवा करणारे इतर महापालिका क्षेत्रात राहत आहेत. त्यांची इथे काहीच व्यवस्था काय केली गेली नाही, मग इतरांकडे बोट दाखविण्याचे राजकारण कशासाठी खेळले जात आहे, असा प्रश्‍न कडू यांनी उपस्थित केला आहे.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago