Categories: Uncategorized

मागील ४८ तासात नवी मुंबईत तब्बल ६१४ कोरोना रूग्ण, परिस्थिती चिंताजनक

सुवर्णा खांडगेपाटील

नवी मुंबई : कोरोनाची आकडेवारी वाढत असल्याने नवी मुंबईकरांच्या तोंडचे पाणी पळाले असून मागच्या ४८ तासात नवी मुंबईचे ६१४ कोरोना रूग्ण नव्याने आढळून आले आहेत. त्यामुळे नवी मुंबई शहर कोरोनाच्या विळख्यात अडकत चालल्याचे स्पष्ट होवू लागले आहे.

शुक्रवारी  नवी मुंबईमध्ये  कोरोनाबधित ३६१ रुग्ण आढळले आहेत, त्यामध्ये बेलापूर नोडमध्ये ३५, नेरुळ नोडमध्ये ७५, वाशी नोडमध्ये २५, तुर्भे नोडमध्ये २७, कोपरखैराणे नोडमध्ये ४७,  घणसोली नोडमध्ये ६२,  ऐरोली नोडमध्ये ७१ तर दिघा नोडमध्ये १९ रूग्ण आढळले आहेत.

शनिवारी नवी मुंबईमध्ये २५३ कोरोना रूग्ण आढळले आहेत. २५ हजार ३० जणांच्या कोरोना चाचण्या आजवर नवी मुंबईत करण्यात आल्या असून त्यापैकी शहरामध्ये ९१३२ पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले तर १५ हजार ४२६ जणांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. ४७२ जणांचे अहवाल अजूनही प्रलंबित आहेत. शनिवारी १६७ जण कोरोना आजारातून पूर्णपणे बरे होवून घरीही परतले आहेत. आतापर्यत ५ हजार ४५२ जण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत.

शनिवारी पॉझिटिव्ह सापडलेल्या २५३ रूग्णांमध्ये बेलापुर नोडमध्ये २५, नेरूळ नोडमध्ये ३४, वाशी नोडमध्ये २५,  तुर्भे नोडमध्ये २४, कोपरखैराणे नोडमध्ये ४७, घणसोली नोडमध्ये ४६, ऐरोली नोडमध्ये ४७ आणि दिघा नोडमध्ये ५ कोरोना रूग्ण आढळून आले आहेत.

नवी मुंबईत लॉकडाऊन काटेकोरपणे पाळला जात नसल्याने रूग्णांच्या संख्येत व नवी मुंबईकरांच्या चिंतेत भर पडली आहे. सांयकाळी ५ वाजल्यानंतर अनेक भागात बाहेरील व अंर्तगत भागात किराणा मालाची दुकाने खुलेआमपणे उघडी दिसत आहेत. किराणा मालाच्या दुकानांनी मार्जिनल स्पेस तर सोडा पण दुकानांसमोरील पदपथावरही अतिक्रमण केल्याचे पहावयास मिळत आहे. रस्त्यावर, नाक्यावर आजही टोळक्याटोळक्याने गर्दी गप्पा मारत असल्याने कोरोनामुक्त नवी मुंबई शहर झाल्याचे दृश्य निर्माण झाले आहे. कोरोना रूग्णांच्या वाढत्या संख्येमुळे रूग्णालये तुडूंब भरली असून उपचारासाठी रूग्णालयात प्रवेश मिळणेही अवघड झाले आहे. ऑक्सिजनचा तुटवडा असून व्हेन्टिलेटर मिळविण्यासाठी आता तारेवरची कसरत करावी लागत आहे. खिशात पैसे असूनही कोरोनासाठी रूग्णालयात दाखल होणे आणि ऑक्सिजन मिळणे आता अवघड झाले आहे.

कोरोना रूग्ण चार-पाच दिवसांमध्ये पूर्णपणे बरे होवून परतत असल्याने लोकांमध्ये कोरोनाबाबत भीती न राहील्याने पथ्यही पाळले जात नाही. पोलिसांनी नाक्यावरील टोळक्यांवर आणि महापालिकेने किराणा दुकानांच्या मार्जिनल स्पेसवरील अतिक्रमणावर कठोर कारवाई केल्याशिवाय लॉकडाऊन यशस्वी होणार नसल्याचे नवी मुंबईकरांकडून सांगण्यात येत आहे. सांयकाळी ५ नंतरही किराणा मालाची दुकाने खुलेआमपणे उघडी ठेवून व्यवहार करणाऱ्या दुकानदारांची दुकाने सील केल्याशिवाय या दुकानदारांना वचक बसणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. महापालिका प्रशासनाने व पोलिसांनी वेळीच खंबीर भूमिका घेवून कारवाई न केल्यास कोरोनाचा उद्रेक आणखी वाढण्याची भीती नवी मुंबईकरांकडून व्यक्त केली जात आहे.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago