Categories: Uncategorized

महापालिका प्रशासनात काम करणाऱ्या ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांची सेवा कायम करण्याची इंटकची मागणी

भास्कर जाधव : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : महापालिका प्रशासनात काम करणाऱ्या ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांची सेवा कायम करण्याची मागणी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, विधानसभा अध्यक्ष नाना पटोळे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व नवी मुंबई पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे केली आहे.

दोनच दिवसापूर्वी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेवून आरोग्य विभागात सर्व कामगारांची भरती प्रक्रिया सुरू करा. नियमानुसार कामगारांना बढती द्या, असे त्यांनी सर्व पालिका आयुक्तांना निर्देश दिले असल्याचे सांगून रवींद्र सावंत आपल्या निवेदनात पुढे म्हणाले की, नवी मुंबई महापालिका प्रशासनात वर्षानुवर्षे ठोक मानधनावर काम करत आहेत. त्यांची सेवा आजतागायत कायम झालेली नाही. नवी मुंबईकरांना नागरी सुविधा पुरविण्याचे व नागरी समस्या सोडविण्याचे महत्वपूर्ण काम या ठोक मानधनावरील कामगारांकडून करण्यात येत आहे. कोरोना काळातही हे कामगार आपल्या जिविताची पर्वा न करता तसेच आपल्या परिवाराचाही विचार न करता नवी मुंबईकरांची सेवा करत आहेत. या सेवेचा कोठेतरी आता प्रामाणिकपणे विचार होणे आवश्यक आहे. राज्य शासनाने इतर महापालिकांना भरतीबाबत निर्देश दिले आहेत, त्याच धर्तीवर नवी मुंबई महापालिका प्रशासनात वर्षानुवर्षे ठोक मानधनावर काम करणाऱ्या कामगारांचीही सेवा कायम करण्यासाठी महापालिका प्रशासनाला निर्देश देण्याची मागणी रवींद्र सावंत यांनी केली आहे.
जे कामगार ठोक मानधनावर पालिकेत काम करीत आहे. त्यांचा विचार भरतीदरम्यान पालिका प्रशासनाने सर्वप्रथम करावा. त्यांना पालिका सेवेचा अनुभव असल्याने त्यांची सरसकट सेवा कायम करण्यात यावी. आरोग्य विभाग, घनकचरा विभाग,
 महापालिका प्रशासनामधील सर्व विभागातील ठोक मानधनावरील कामगारांना पहिले थेट भरती करून घ्यावे. या कामगारांच्या सेवेबाबतचा प्रस्ताव आपण महापालिका प्रशासनाला तात्काळ बनविण्यास सांगावे आणि मुख्यमंत्र्यांकडून तसेच नगरविकास मंत्र्यांकडून या प्रस्तावास मंजुरी मिळवून घ्यावी. पालिका प्रशासनात काम करताना काही कामगारांची वयोमर्यादाही उलटून गेलेली असणार. तथापि त्यांची पालिका प्रशासनातच सेवा असल्याने माणूसकीच्या निकषावर वय हा मुद्दा हा प्रतिष्ठेचा अथवा तांत्रिक अडचणीचा होवू नये. त्यांना कामाचा अनुभव आहे. बिनअनुभवी कामगार भरती करण्याएवजी याच अनुभवी कामगारांची त्या ठिकाणी वर्णी लागल्यास प्रशासनाचेही नुकसान होणार नाही. मागे यासंदर्भात मा. विधानसभा अध्यक्ष नाना पटोळे यांची विधानभवनातील दालनात कामगारांच्या कायम सेवेबाबत पालिका अधिकारी व इंटकचे प्रतिनिधी यांची पटोळेसरांसमवेत बैठक झालेली आहे. महापालिका प्रशासनाला या कामगारांच्या कायम सेवेबाबत निर्देश दिले असल्याचे रवींद्र सावंत यांनी निवेदनात म्हटले आहे.
आरोग्य विभागात सर्वप्रथम पालिका प्रशासन भरती करणार आहे, त्या भरतीत ठोक मानधनावर बहुउद्देशीय कामगार, परिचारिका, (anm, jnm), लिपिक, कंपाऊन्डर तसेच घनकचरा विभागातील सर्व ठोक मानधनवरील कर्मचारी, जीवाची पर्वा न करता काम करत असून त्यातल्या काहींना कोरोनाची लागणही झालेली आहे. अत्यंत कमी पगारात हे ठोक मानधनावरील कामगार काम करत आहेत. त्यांची सामाजिक सुरक्षा धोक्यात आलेली असून मानवअधिकाराचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आपली सेवा आज ना उद्या कायम होईल या आशेने ते पालिका प्रशासनात ते काम करत आहे, त्यांच्या परिश्रमाला आपण न्याय मिळवून द्यावा व त्यांची सेवा कायम करण्याविषयी संबंधित विभागाना  निर्देश देण्याची मागणी रविंद्र सावंत यांनी केली आहे.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago