Categories: Uncategorized

मनोज मेहेरच्या पाठपुराव्यामुळे नेरूळ सेक्टर सहाच्या व सारसोळे गावातील अंर्तगत भिंतींच्या रंगरंगोटीला सुरूवात!

आयुक्त, विभाग अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा मनोज मेहेरचा, इतरांची श्रेयासाठी केविलवाणी धडपड, जनतेत चर्चा  सुरू

सुजित शिंदे : ९६१९१९७४४४

Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : नेरूळ  सेक्टर सहाच्या अंर्तगत  भागातील साडे बारा टक्क्याच्या इमारती व इतर इमारतीच्या संरक्षक भिंती तसेच  सारसोळे  गावातील अन्य इमारतींच्या संरक्षक भिंतींची स्वच्छता अभियानांतर्गत रंगरंगोटीस  सुरूवात झाली आहे. सारसोळे गावातील समाजसेवक मनोज  मेहेर यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर व नेरूळ विभाग अधिकारी कार्यालयाकडे केलेला लेखी पाठपुरावा  आणि अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष घेतलेल्या भेटीगाठी यामुळे या कामाला सुरूवात झाल्याचे नेरूळ सेक्टर सहामधील जनतेला, सारसोळे गावातील ग्रामस्थांना सोशल मिडिया  तसेच वर्तमानपत्रातील  बातम्यांतून माहिती असतानाही काही  घटक रंगरंगोटी होत असलेल्या ठिकाणी नाहक हेलपाटे मारून श्रेयासाठी केविलवाणी धडपड करत असल्याने स्थानिक जनतेमध्ये व सारसोळेच्या ग्रामस्थांमध्ये त्यांचे उघडपणे ‘हसे’  होवू लागले आहे. गेली १५ वर्षे मनोज  मेहेर आमच्यासाठी  राबतोय, समस्या सोडवतोय, जनता दरबार,  मंत्रालय, महापालिका दरबारी  भांडतोय आणि ज्यांनी आयुष्यात  दोन पत्रे आजवर दिली नाही , ते मात्र आता श्रेयासाठी हेलपाटे मारू लागल्याची उपहासात्मक चर्चा  सारसोळेच्या ग्रामस्थांमध्ये आणि नेरूळ सेक्टर सहाच्या जनतेमध्ये सुरू झाली आहे.

स्वच्छता अभियानामध्ये यापूर्वी केवळ बाहेरील व  प्रदर्शनी भागातील इमारतीच्या संरक्षक भिंतींची रंगरंगोटी करून  त्यावर सुभाषिते रंगवली जात असे. नेरूळ सेक्टर सहामधील अंर्तगत भागातील साडेबारा टक्केच्या इमारती  व अन्य इमारती  तसेच सारसोळे गावातील इमारतींच्या संरक्षक भिंतींची आजवर कधीही रंगरंगोटी झाली नव्हती तसेच सुभाषिते रंगविण्यात आली नव्हती. मनोज मेहेर यांनी नेरूळ सेक्टर सहाच्या अंर्तगत  भागातील तसेच सारसोळे गावातील अंर्तगत भागातील इमारतींच्या संरक्षक भिंतींची रंगरंगोटी करावी व त्यावर सुभाषिते टाकावीत यासाठी महापालिका आयुक्त अभिजित बांगर व  नेरूळचे विभाग अधिकारी कार्यालय यांच्याकडे सातत्याने लेखी पाठपुरावा  केला. अधिकाऱ्यांच्या सतत भेटी  घेतल्या. अखेरीला मनोज मेहेरच्या पाठपुराव्याची पालिका प्रशासनाला दखल घ्यावी लागली.  सारसोळे गावातील तसेच नेरूळ सेक्टर सहा परिसरातील अंतर्गत भागात असणाऱ्या साडेबारा टक्केच्या इमारती व इतर इमारतींच्या संरक्षक भिंतीच्या रंगरंगोटीस सुरूवात झाली आहे. मनोज मेहेरच्या पाठपुराव्यामुळे हे होत असल्याचे नेरूळ सेक्टर सहामधील रहीवाशांना व सारसोळेच्या ग्रामस्थांना माहिती असतानाही इतरांचे श्रेयासाठी सुरू झालेले हेलपाटे रहीवाशांसाठी मनोरंजनाचा विषय बनला आहे.

गणेश नाईक पालकमंत्री असताना प्रत्येक जनता दरबारात नेरूळ  सेक्टर सहाच्या रहीवाशांसाठी व सारसोळेच्या ग्रामस्थांसाठी मारलेले हेलपाटे, महापालिका मुख्यालय, मंत्रालय, महापालिका विभाग अधिकारी कार्यालय, सिडको, पोलीस  आयुक्तालय सर्वच ठिकाणी मनोज मेहेरचा पाठपुरावा व प्रत्यक्ष भेटीगाठी सारसोळे ग्रामस्थांना आणि नेरूळ सेक्टर सहाच्या जनतेला माहिती असल्यामुळे इतरांनी हेलपाटे मारले व श्रेय घेण्याचा प्रयत्न  केला तरी कोणी फसणार नसल्याची चर्चा उघडपणे सुरू झाली आहे.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

4 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

4 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

4 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

4 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

4 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

4 years ago