Categories: Uncategorized

मतदार नोंदणीचा कालावधी वाढवा : सौ. रूपाली किस्मत भगत

नवी मुंबई : ऑनलाईन मतदार नोंदणी प्रक्रियेत तांत्रिक अडचणी वाढत चालल्याने मतदार  नोंदणीचा कार्यक्रमात मुदतवाढ करण्याची मागणी भाजपच्या प्रभाग ९६च्या माजी नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत यांनी बेलापुर विधानसभा  मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे बुधवारी केली आहे.

सध्या निवडणूक आयोगाकडून नवी मुंबईत मतदार नावनोंदणीचा कार्यक्रम ऑनलाईन पध्दतीने सुरू आहे. सामाजिक कार्यकर्ते व विविध राजकीय घटक मतदारनोंदणीसाठी उत्साहाने कार्यरत आहेत. तथापि ऑनलाईन पध्दतीने मतदारनोंदणी कार्यक्रमात संगणकीय प्रणालीमध्ये विविध अडथळ्यांचा सामना करावा लागत असल्याने मतदारनोंदणी करताना मर्यादा पडत आहेत. मतदार नाव नोंदणींची लिंक ओपन न  होणे, मध्येच लींक बंद पडणे, नेट नसणे, माहिती भरत असताना लिंक  तुटणे यासह विविध अडचणींचा मतदारनोंदणीत सामना करावा लागत असल्याचे सौ. रूपाली किस्मत भगत यांनी निवेदनात म्हटले आहे.

ऑनलाईन मतदार नावनोंदणी करताना येत असलेले अडथळे पाहून निवडणूक आयोगाने ऑनलाईन पध्दतीने मतदार नावनोंदणीच्या कार्यक्रमास मुदतवाढ देणे आवश्यक आहे. तसेच ऑनलाईन पध्दतीने नावनोंदणी होण्यास विलंब होत असल्याने महापालिका शाळांमध्ये आपण आपले कर्मचारी आठ दिवस नियुक्त करून मतदार नावनोंदणीचा कार्यक्रम राबवावा. मतदार नावनोंदणीमध्ये ऑनलाईन पध्दतीत  येत असलेले अडथळे पाहता समस्येचे गांभीर्य जाणून लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी सौ. रूपाली किस्मत भगत यांनी केली आहे.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago