Categories: Uncategorized

भाजपा नेरुळ प्रभाग क्रमांक-९६ च्या वतीने प्रभागातील साफ सफाई कामगारांचा सत्कार

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेला स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण -२०२० भारत देशात तीसरा क्रमांक आणि महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक मिळाला. नवी मुंबई शहरातील साफ सफाई  चांगली व्हावी यासाठी रस्त्यावर उतरून जीवाचे रान करणाऱ्या  साफ सफाई कामगारांचा शुक्रवार, दि. २१ ऑगस्ट रोजी जनसेवक गणेश भगत आणि स्थानिक नगरसेविका रुपाली किसमत भगत यांच्या वतीने प्रत्येकी एक छत्री आणि सॅनिटायझर बॉटल देवून सत्कार करण्यात आला.

नवी मुंबई महानगरपालिकेचे सर्व अधिकारी वर्ग, सर्व विभागातील सफाई कर्मचारी, सर्व सफाई कामगार आपल्या नवी मुंबई शहरातील मार्केट, गार्डन, मैदान टॉयलेट, फुटपाथ, तसेच रस्त्याची साफसफाई चांगली व्हावी यासाठी जीवाचे रान करीत होते. नवी मुंबईतील नागरिकांनीही आपली सामाजिक जबाबदारी समजून स्वछतेच्या नियमांचे पालन करून नवी मुंबई शहर स्वच्छ ठेवायला हातभार लावला. त्यामुळे आज नवी मुंबई महानगरपालिकेला स्वच्छ भारत मिशन अंतर्गत देशात तीसरा क्रमांक आणि महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक भेटला असल्याचे गणेश भगत यांनी सांगितले

यावेळी गणेश भगत यांनी स्वछता पुरस्काराचे सर्व श्रेय महापालिका अधिकारी वर्ग, साफ सफाई कामगार, सर्व नागरिक आणि सर्व लोकप्रतिनिधी यांना दिले आणि त्यां सर्वांचे हार्दिक अभिनंदन आणि जाहिर आभार मानले. यावेळी समाजसेवक अशोक गांडाल, सागर मोहिते, जयेंद्र मढ़वी, रविंद्र भगत उपस्थित होते.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago
magbo system