Categories: Uncategorized

भाजपच्या केंद्र सरकारविरोधात कॉंग्रेसचे रस्त्यावर आंदोलन

आंदोलनादरम्यान रास्ता रोको, कृषी विधेयकाची प्रत जाळली, सरकारविरोधात घोषणाबाजी

नवी मुंबई : केंद्र सरकारने सभागृहात चर्चा न करता बहूमताच्या जोरावर मंजुर केलेल्या शेतकरी कायद्याविरोधात नेरूळ तालुका कॉंग्रेसच्या वतीने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनादरम्यान रास्ता रोको, कृषी विधेयकाची होळी आणि केंद्र सरकारच्या विरोधात  घोषणाबाजी यामुळे नवी मुंबईत आज नेरूळ तालुका कॉंग्रेसच्याच आंदोलनाची चर्चा सुरू आहे.

नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते व नेरूळ तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. विशेष म्हणजे या आंदोलनात स्थानिक भागातील महिला वर्ग स्वत:हून सहभागी झाल्याने भाजपविरोधातील सर्वसामान्यांचा रोष आता उघडपणे पहावयास मिळाला. नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव  प्रल्हाद गायकवाड, विद्या भांडेकर, नेरूळ तालुका ब्लॉक कॉंग्रेसचे  उपाध्यक्ष दिनेश गवळी,नेरूळ कॉंग्रेसचे सचिव संतोष पाटील, शेवंता मोरे यांच्यासह स्थानिक महिला मोठ्या  संख्येने आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

केंद्र सरकारच्या विरोधात बराच वेळ रस्त्यावर घोषणाबाजी झाली. यामुळे वाहतुक कोंडीही झाली, घोषणाबाजीनंतर केंद्राने मंजुर केलेल्या कृषी विधेयकाची प्रत रस्त्यावर जाळण्यात आली. कॉंग्रेसच्या या आंदोलनाची चर्चा अवघ्या काही वेळातच नवी मुंबईत सुरू झाली.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago
magbo system