Categories: Uncategorized

प्रभाग ९६ मध्ये भाजपकडून समाजोपयोगी उपक्रमांची मांदियाळी

नवी मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रहीवाशी भयभीत असताना त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी नेरूळ पश्चिमेला प्रभाग ९६ च्या भाजपच्या स्थानिक नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत व समाजसेवक  गणेशदादा भगत यांनी आरोग्यविषयक उपक्रमांचा धडाका लावत स्थानिक रहीवाशांना  दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

कोरोनाचे पडघम वाजू लागताच नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत व समाजसेवक  गणेशदादा भगत यांनी प्रभागातील जनतेमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करताना २५०० मास्कचे घराघरात जावून वाटप  केले  आणि जनतेला घरात बसण्याचा सल्ला दिला. याशिवाय प्रभागातील सर्वच गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये स्वखर्चाने धूरफवारणी केली. सोसायटीतील सदनिकाबाहेरील जागा, टेरेस, सोसायटीआवारातील सार्वजनिक जागा  सर्वत्र धूरफवारणी करण्यात आली. आजही ज्या ज्या सोसायटीतून मागणी होत आहे, त्या त्या गृहनिर्माण  सोसायट्यांमध्ये धूरफवारणी करण्याचे काम सुरुच आहे. याशिवाय परिसरातील १०० गरीब परिवाराला मोफत  अन्नधान्य पोहोचविण्याचे काम केले.

परिसरात कोणी आजारी पडल्यास कधी रूग्णवाहिकेतून तर कधी वेळ पडल्या स्वत:च्या वाहनातून रूग्णालयात घेवून  जाण्याचे काम भगत परिवार करत आहे. अनेक परिवार गावी गेले असल्याने समाजसेवक गणेशदादा भगत, किसमत  भगत, रवी  भगत हे तीनही भाऊ  याशिवाय रात्री-अपरात्री वाहनातून गस्त घालत असून कोठे चोर्‍या होणार नाही याची काळजी घेत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत व समाजसेवक  गणेशदादा भगत हे सतत विविध उपक्रम व अभियान राबविताना जनतेला खर्‍या अर्थाने दिलासा देण्याचे काम करत आहेत.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago
magbo system