Categories: Uncategorized

प्रभाग ८७ मध्ये घरटी मास स्क्रिनिंग करण्याची मागणी

नवी मुंबई : कोरोना रूग्णांची वाढती मागणी पाहता प्रभाग ८७ मधील नेरूळ सेक्टर ८ व १० परिसरात घरोघरी जावून मास स्क्रिनिंग करण्याची मागणी शिवसेना विभागप्रमुख व माजी नगरसेवक रतन मांडवे यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.

नवी मुंबई शहरात कानकोपऱ्यात कोरोनाचे रूग्ण वाढू लागले आहेत.  नवी मुंबईच्या शहरी व ग्रामीण भागातही कोरोना रूग्ण दररोज मोठ्या संख्येने आढळून येत आहे. महापालिका प्रशासनाकडून काळजी घेतली जात आहे, उपाययोजना केल्या जात आहे. ठिकठिकाणी अॅण्टीजेन चाचणीही सुरू केली आहे. नेरूळ सेक्टर ८ व १० परिसर हा पूर्णपणे सिडको गृहनिर्माण सोसायट्यांचा परिसर व एलआयजी वसाहतीचा आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नेरूळ सेक्टर १० परिसरात घरटी जावून महापालिका प्रशासनाकडून मास स्क्रिनिंग करण्यात येत आहे. नेरूळ सेक्टर ८ मधील सिडको सदनिकाधारकांत व एलआयजीमधील रहीवाशांमध्ये तसेच खासगी सोसायटीतील रहिवाशांत भीतीचे वातावरण आहे. अॅण्टीजेनसाठी गेल्यास आपण निरोगी असलो तरी तेथील कोरोना रूग्णामुळे आपणासही कोरोना होईल असा समज येथील रहीवाशांमध्ये असल्याचे रतन मांडवे यांनी निवेदनात म्हटले आहे.

नेरूळसेक्टर १० व ८ मध्ये पालिका प्रशासनाच्या वतीने घरोघरी मास स्क्रिनिंग केले जावे यासाठी आम्ही यापूर्वीही पालिका प्रशासनाकडे लेखी पाठपुरावा केलेला आहे. समस्या गंभीर आहे. लोकांमध्ये भीतीचे वातावरण घालविण्यासाठी लवकरात लवकर पालिका प्रशासनाकडून सेक्टर ८ मध्ये घरोघरी मास स्क्रिनिंग करण्याचे अभियान सुरू करण्याची मागणी रतन मांडवे यांनी केली आहे.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago