Categories: Uncategorized

प्रभाग ८६मध्ये मल:निस्सारण वाहिनीच्या कामाचा शुभारंभ

नवी मुंबई : नेरूळ नोडमधील महापालिका प्रभाग ८६ मधील सारसोळे गावात  नव्याने मल:निस्सारण  वाहिन्या टाकण्याच्या कामास बु्धवारी (दि. २५) सकाळी शुभारंभ झाला. नगरसेवक निधीतून प्रभागातील तीन ठिकाणच्या मल:निस्सारण वाहिन्या पूर्णपणे या कामामध्ये बदलण्यात  येणार असल्याची माहिती भाजपच्या माजी नगरसेविका सौ. जयश्री एकनाथ ठाकूर यांनी दिली.

सारसोळे ग्रामस्थांनी मल:निस्सारण वाहिन्या जुनाट झाल्याने बदलण्याची सतत मागणी केल्याने नगरसेवक निधीतून या वाहिन्या टाकण्याच्या कामाचा शुभारंभ झाला. महापालिका सभागृह विसर्जित होण्यापूर्वीच या कामाला मंजुरी मिळाली होती. तथापि मार्चच्या मध्यावर कोरोना महामारीच्या लाटेचा उद्रेक झाल्याने महापालिका प्रशासनाकडून विकासकामांना पूर्णपणे स्थगिती देण्यात आली होती.   कोरोनाचा प्रभाव काही प्रमाणात कमी होताच विकासकामांना महापालिका प्रशासनाने टप्याटप्याने शुभारंभ केला  आहे. त्यात बुधवारी  सकाळी सारसोळे गावातही मल:निस्सारण वाहिन्या बदली करण्याच्या कामाचा समावेश होता. या कामाचे उद्घाटन माजी नगरसेविका  जयश्री  ठाकूर यांनी न करता  स्थानिक रहीवाशांच्या हस्ते केले. स्थानिक रहीवाशांनी भरलेल्या करातूनच विकासकामे मार्गी लागत असल्याने उद्घाटनावरही हक्क त्यांचाच असल्याचे जयश्री ठाकूर यांनी सांगितले.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago