Categories: Uncategorized

प्रभाग ७६ मध्ये आ. मंदाताई म्हात्रेंचा वाढदिवस उत्साहात साजरा

नवी मुंबई : भाजपच्या बेलापुरमधील आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांचा वाढदिवस सानपाडा, प्रभाग ७६ मध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त समाजसेवक व आ. मंदाताई म्हात्रे समर्थक  असलेले भाजपा कार्यकर्ते पांडुरंग आमले यांनी विविध स्पर्धाचे तब्बल ७  दिवस आयोजन वाढदिवसानिमित्त केले होते. प्रभाग ७६ मध्ये सप्ताहभर  चाललेल्या या वाढदिवस सोहळ्यानिमित्ताने हळदीकुंकु समारंभाला स्वत:  आ.  सौ. मंदाताई म्हात्रेदेखील उपस्थित राहील्या होत्या.

१४ व १५ जानेवारीदरम्यान ब्लॅक अॅण्ड ब्युटी ऑनलाईन स्पर्धा आयोजित करण्यात आली.  स्पर्धेसाठी काळ्या रंगाची साडी नेसून व सोन्याचे आभूषण घातलेला फोटो व्हॉटस अपवर पाठविण्याचे आवाहन करण्यात आले होते. या स्पर्धेत २२ महिला सहभागी झाल्या, त्यातील ३ महिलांना पारितोषिकांनी गौरविण्यात आले. १६-१७ जानेवारी रोजी सानपाडा सेक्टर २ येथील खेळाचे मैदानावर क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.  या स्पर्धेत प्रभाग ७६ मधील २४ संघ सहभागी झाले होते. यामध्ये सेक्टर ८ मधील संकल्प सोसायटीने विजेतेपद तर सह्याद्री सोसायटीने उपविजेतेपद मिळविले. अविनाश जाधव  यांच्या गुरूकृप्पा सोसायटीला तिसरा क्रमांक मिळाला. विजेत्यांना १० हजार रूपये व ट्राफी तर उपविजेत्यांना ५ हजार रूपये व  ट्राफी देवून गौरविण्यात आले. १८ जानेवारी रोजी झालेल्या कॅरम स्पर्धेत ४८ पुरूष स्पर्धक तर १४ महिला स्पर्धक सहभागी झाले होते. १० ते १५ वयोगटातील स्पर्धेत  ८ स्पर्धक सहभागी झाले होते. पुरूष गटात ३, महिला  गटात २ तर लहान मुलांच्या गटात एकाला ट्राफी देवून गौरविण्यात आले. नृत्य स्पर्धेत  २८ स्पर्धक सहभागी झाले  होते. त्यातील ८ विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये मोठ्या मुलांच्या ग्रुपमध्ये ३ तर लहान मुलांच्या ग्रुपमधील ५ जणांचा  समावेश आहे. वेशभुषा, अभिनय व  पाककला स्पर्धाही उत्साहात पार पडली. यातही स्थानिक भागातील स्पर्धक उत्साहाने सहभागी झाले होते. फॅशन शोचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यातील  विजेतीला मिस सानपाडा पुरस्काराने गौरविण्यात आले.

हळदीकुंकु समारंभात  ७५०हून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या. या महिलांशी सुसंवाद साधण्यासाठी बेलापुरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे स्वत:  या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. विशेष म्हणजे अडीच तासाहून अधिक काळ आ. मंदाताई म्हात्रे या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.  १० पैठणी, एक सोन्याची नथ, एक फ्रीज, तीन प्रेशर कुकर, ३ इस्त्री, ३ हेअर ड्रायर अशी लकी ड्राच्या माध्यमातून हळदीकुंकु समारंभात सहभागी झालेल्या भाग्यवंत महिलांना आमदार मंदाताई म्हात्रेंच्या हस्ते देण्यात आले.या कार्यक्रमात सिनेकलाकार कमलाकर सातपुते, आशिष पवार (कॉमेडीची बुलेट ट्रेन फेम), सुप्रिसध्द नृत्यांगणा व सिनेअभिनेत्री अस्मिता सुर्वे, सुप्रिया तहकर  सहभाग  झाले होते.

आ. मंदाताई म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त  तब्बल ७ दिवस  आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धाचे आयोजन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी समाजसेवक पांडुरंग आमले यांच्यासमवेत भाजपाचे तालुका मंडळ अध्यक्ष श्रीमंत जगताप, महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्षा सौ. आज्ञा गव्हाणे, भाजपा तालुका सचिव रमेश शेटे, तालुका महामंत्री निलेश वर्पे, महिला जिल्हा उपाध्यक्षा निता आंग्रे, महिला तालुका महामंत्री मंगल वाव्हळ, तालुका सचिव सुलोचना निंबाळकर, तालुका महामंत्री  प्रियंका वडगाये, तालुका  सदस्या प्रतिभा पवार, संचिता जोएल, दिशा केणी, समाजसेविका सौ. शारदा पांडुरंग आमले, सिध्देश आमले, शुभम आमले, अनिशा गव्हाणे, अंतरा गव्हाणे, संकेत पाटील यांनी परिश्रम घेतले.

हळदीकुंकू, नृत्य स्पर्धा व, फॅशन शोचे आयोजन आर.नाईक  इव्हेंटने (राकेश नाईक), सहनिर्माती अस्मिता सुर्वे या होत्या. फॅशन शोचे जज म्हणून मॉडेल अपूर्वा पाटील यांनी तर पाककलेचे जज म्हणून श्रीशपाल यांनी नियोजन केले होते. बेलापुर विधानसभा मतदारसंघात प्रभाग ७६ मध्ये आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांचा वाढदिवस  सर्वाधिक उत्साहात व कार्यक्रमांच्या आयोजनांनी साजरा झाला.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago