Categories: Uncategorized

प्रभाग क्रं १५ मधील विविध नागरी कामांचा उद्घाटन सोहळा उत्साहात

ऐरोली : नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी आरोग्य समिती सभापती अशोक पाटील यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या विविध नागरी कामांचा उदघाटन सोहळा नवी मुंबईचे विकासपर्व व  त्यागमूर्ती या नावाने महाराष्ट्रात ओळखल्या जाणारे ऐरोलीचे प्रथम आमदार संदीप नाईक यांच्या हस्ते संपन्न झाला.

संदीप नाईक यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या विकास कामांमध्ये १) सेक्टर १४ व १५ मधील सर्व रस्त्यांचे डांबरीकरण करणे. २) स्वामी विवेकानंद उद्यानाचे सुशोभीकरण करणे. ३) सेक्टर १४ मधील संत गाडगेबाबा उद्यानातील विद्युत रोषणाईचा लोकार्पण सोहळा, ४) दिवा सर्कल ते गणेश मंदिर मुख्य रस्त्यालगतच्या पदपथाचे कॉंक्रिटीकरण करणे, ५) सेक्टर १४पोलीस चौकी समोरील कॉर्नरला फाऊंटन(कारंजे) बनवणे, ६) वैतरणा सोसायटी आवारामध्ये डांबरीकरण करणे या कामाचा समावेश आहे.

सदर उद्घाटन प्रसंगी माजी नगरसेविका सौ संगीता पाटील, वार्ड अध्यक्ष कैलास गायकर, समाजसेवक राजेंद्र जोशी, सदानंद दरेकर, राजेश शुक्ला, नामदेव कुंभार, प्रसाद शिंदे, सौ.जया अवरादे, सौ. इंदुमती किंद्रे तसेच वार्ड मधील महिला युवक युवती मोठ्या संख्येने रहिवाशी बंधू-भगिनी उपस्थित होते.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago