Categories: Uncategorized

प्रभागात पाहणी अभियान राबवा : मा. नगरसेविका रूपाली भगत

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३

Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई :  प्रभाग ९६ मधील डेब्रिजचे व कचऱ्याचे ढिगारे हटविण्याची तसेच गृहनिर्माण सोसायट्यांना कचऱ्याचे डब्बे वितरीत करण्याची, स्वच्छता सर्व्हेक्षणाअंर्तगत उर्वरित गृहनिर्माण सोसायट्यांच्या संरक्षक भिंतींची रंगरंगोटी करण्याची तसेच विभागात पाहणी अभियान राबविण्याची मागणी प्रभाग ९६ मधील भाजपच्या माजी नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत यांनी नेरूळ विभाग अधिकारी  व स्वच्छता अधिकारी यांच्याकडे केली आहे.

महापालिका प्रभाग ९६ मध्ये नेरूळ सेक्टर १६, १६ए आणि १८ या परिसराचा समावेश होत आहे. प्रभागाला शहरी भागात प्रथम क्रमाकांचा स्वच्छतेचा पुरस्कारही नुकताच मिळालेला आहे. स्वच्छतेचा पुरस्कार मिळणाऱ्या प्रभागात मोकळ्या भुखंडावर डेब्रिजचे व कचऱ्याचे ढिगारे असणे ही बाब महापालिका प्रशासनासाठी व स्थानिक रहीवाशांसाठी भूषणावह नसल्याचे सांगत सौ. रूपाली किस्मत भगत यांनी विभाग अधिकारी व स्वच्छता अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देताना नाराजी व्यक्त केली आहे.

प्रभागात सेक्टर १६ए भुखंड क्रं  १२२ शेजारी, सेक्टर १६ ए परिमल गृहनिर्माण सोसायटीसमोरील मोकळ्या भुखंडावर डेब्रिजचे ढिगारे पडलेले आहेत.  प्रभागातील अनेक गृहनिर्माण  सोसायट्यांचे कचऱ्याचे डब्बेही तुटलेले आहेत. त्यामुळे सोसायटी आवारात कचरा संकलन करताना तसेच सोसायटीतून कचरा वाहक गाडीपर्यत कचरा वाहून नेताना कचरा विखुरला जातो. त्यामुळे सोसायटीतील आवार व सोसायटीबाहेरील  रस्ता याला बकालपणा येवून दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.

स्वच्छता सर्व्हेक्षणाअंर्तगत प्रभागातील उर्वरित गृहनिर्माण सोसायट्यांच्या संरक्षक भिंतींना रंगरंगोटी अजून बाकी आहे. ती त्वरीत पूर्ण करण्यात यावी तसेच प्रभागातील समस्यांची पाहणी करण्यासाठी लवकरात लवकर पाहणी अभियान राबवावे, जेणेकरून समस्यांची कल्पना येईल व समस्या निवारणासाठी आम्ही सतत करत असलेल्या पाठपुराव्याचेही गांभीर्य आपल्या निदर्शनास येईल, असे यावेळी भाजपच्या माजी नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत यांनी सांगितले.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago