Categories: Uncategorized

प्रभागातील अविकसित भुखंडाचे माजी नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत यांच्याकडून स्वखर्चातून सुशोभीकरण

नवी मुंबई : प्रभाग ९६ मधील अविकसित भुखंडाचे भाजपच्या माजी नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत यांनी स्वखर्चाने सुशोभीकरण केले आहे. अविकसित भुखंडाची समस्या निकाली निघाल्याने स्थानिक रहीवाशांकडून माजी नगरसेविका  सौ. रूपाली किस्मत भगत आणि जनसेवक गणेश भगत यांच्या कार्याची प्रशंसा केली जात आहे.

नेरूळ सेक्टर १६ ए, प्लॉट १२३ वरील अविकसित भुखंडाच्या सुशोभीकरणाबाबत स्थानिक रहीवाशांनी माजी नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत यांच्याकडे मागणी केली होती. हा निवासी परिसरातील भुखंड डेब्रिज व  अन्य कारणामुळे अविकसित होता व त्यास बकालपणाही प्राप्त झाला होता. माजी नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत यांनी तात्काळ रहीवाशांच्या मागणीला न्याय देताना भुखंडाच्या सुशोभीकरणाला सुरूवात केली. या अविकसित भुखंडावरील डेब्रिज हटविण्यात आले. जनसेवक गणेश भगत यांनी या भुखंडावर एक ट्रक लाल माती आणून टाकली. ही माती संपूर्ण भुखंडावर पांगविण्यात आली. अवघ्या ४८ तासातच या भुखंडाचा चेहरामोहरा बदली झाला असून डेब्रिजसह अविकसितपणाची  व बकालपणाची समस्या  संपुष्ठात आली. अजून एक दिवस या भुखंडावर सुशोभीकरणाचे काम होणार असून त्यानंतर  हा भुखंड स्थानिक मुलांना खेळण्यासाठी उपलब्ध होणार आहे. अविकसित भुखंडावरील डेब्रिज हटवून त्याचे सुशोभीकरण केल्याबाबत स्थानिक रहीवाशांकडून सौ. रूपाली किस्मत भगत आणि गणेश भगत यांचे आभार मानण्यात आले आहेत.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

4 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

4 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

4 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

4 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

4 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

4 years ago