Categories: Uncategorized

पोलिसांसाठी साकारण्यात आलेला हा गृहप्रकल्प म्हणजे पोलिसांप्रति असलेल्या कृतज्ञनतेची पोचपावती : मुख्यमंत्री

सुवर्णा खांडगेपाटील

नवी मुंबई : “पोलिस अविरतपणे दिवस – रात्र आपल्या जीवाची व परिवाराची पर्वा न करता आपल्या संरक्षणार्थ उभे असतात. अशा पोलिसांना हक्काचे व स्वप्नातले घर सिडकोच्या या गृहनिर्माण योजनेच्या माध्यमातून प्राप्त होणार आहे असे उद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी काढले.” पोलिसांसाठी असलेल्या ४४६६ घरांच्या योजनेचा शुभारंभ, सिडकोच्या गृहनिर्माण योजनेतील ३६७० यशस्वी अर्जदारांना घरांचे ऑनलाईन वाटप, तसेच व्हर्चुअल निवारा केंद्राचे आणि खारघर हेवन हिल्स प्रकल्पाचा शुभारंभ व मुख्यमंत्री सहाय्यता निधी – कोविड – १९ फंडास सिडकोतर्फे १ कोटीची मदत या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. या सर्व प्रकल्प व सुविधांचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते २७ जुलै रोजी व्हिडीओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून करण्यात आला.  

याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री अनिल देशमुख, कामगारमंत्री नवाब मलिक, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, परिवहन मंत्री अनिल परब, रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, मुख्य सचिव संजय कुमार, अतिरिक्त मुख्य सचिव सिताराम कुंटे, पोलीस महासंचालक सुबोध कुमार जायस्वाल, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, सहव्यवस्थापकीय संचालक अश्विन मुद्गल, सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. प्रशांत नारनवरे, सहव्यवस्थापकीय संचालक अशोक शिनगारे, मुख्य दक्षता अधिकारी निसार तांबोली, जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे, व्यवस्थापक (पणन) २ लक्ष्मीकांत डावरे, यांसह सिडकोतील इतर विभाग प्रमुख, अधिकारी आणि कर्मचारीदेखील उपस्थित होते.

“सिडकोतर्फे सदनिकांच्या सोडतीतील विविध टप्प्यांत जसे व्हर्च्युअल निवारा केंद्र व ऑनलाईन माध्यमातून वाटपपत्र प्रदान करणे यांसारख्या प्रणाली व प्रक्रीयांमधून उच्च दर्जाची पारदर्शकता राखण्यात येत आहे. ही पारदर्शकता अजोड असून अनुकरणीय आहे. त्याचबरोबर सिडकोतर्फे निसर्गाच्या सान्निध्यात साकारण्यात येत असलेल्या खारघर हेवन हिल्स प्रकल्पाच्या माध्यमातून नवीन वृक्षांची लागवड करून निसर्गाचा समतोल राखण्याचा प्रयत्न केला जात आहे. महाराष्ट्रात अशा प्रकारचे हिल स्टेशन साकारला जाणे ही खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे. याशिवाय सिडकोतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला रू. 1 कोटी ची करण्यात आलेली मदत अतिशय महत्वपूर्ण असल्याचे उद्गार  मुख्यमंत्री यांनी काढले.”

“आपले स्वतःचे घर असावे असे प्रत्येकाने उराशी बाळगलेले एक स्वप्न असते. पोलिसदेखील यापेक्षा वेगळे नाहीत. त्यांच्या हक्काच्या घराचे स्वप्न आज सिडकोच्या या गृहनिर्माण योजनेच्या माध्यमातून पूर्ण होत आहे ही खूप आनंदाची गोष्ट आहे. ब्रिटीशांच्या काळात महाराष्ट्रात अनेक हिल स्टेशन्स साकारली गेली. परंतु त्यानंतर खारघर हेवन हिल्स प्रकल्पाच्या माध्यमातून निसर्गाचा समतोल राखून असे हिल स्टेशल सिडकोतर्फे साकारण्यात येत आहे ही महाराष्ट्राच्या दृष्टीने खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे. याशिवाय ऑनलाईन माध्यमातून प्रदान करण्यात आलेली वाटपपत्रे व व्हर्च्युअल निवारा केंद्राचा या कोरोना पॅनडेमिकच्या कठीण परिस्थितीत अर्जदारांना नक्कीच फायदा होईल असे उद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले.”

“सिडकोतर्फे आज खास पोलिस कर्मचाऱ्यांसाठी शुभारंभ करण्यात आलेला गृहनिर्माण योजनेचा प्रकल्प म्हणजे समस्त पोलिसांसाठी खरोखर खूप मोठा निर्णय आहे. अतिशय माफक दरांत व उत्तम दर्जाची ही घरे पोलिसांसाठी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून दिली गेली आहेत. हा केवळ पहिला टप्पा असून सिडकोकडून यापुढेदेखील पोलिसांसाठी अशा प्रकारचे प्रकल्प साकारले जातील असा मला विश्वास आहे असे उद्गार गृहमंत्री अनिल देशमुख यांनीकाढले.”

“खास पोलिसांसाठी इतक्या मोठ्या प्रमाणावर, माफक दरात व उत्तम दर्जाची घरे उपलब्ध करून देणे हे सिडकोतर्फे उचलण्यात आलेले एक ऐतिहासिक पाऊल आहे. पोलिसांप्रति असलेली कृतज्ञता यातून व्यक्त केली जात आहे. पोलिसांचे घरांचे स्वप्न सत्यात उतरावे यासाठी सिडकोच्या माध्यमातून शासनातर्फे नेहमीच प्रयत्न करण्यात आला आहे. आज ते प्रयत्न सत्यात उतरले आहेत. याशिवाय खारघर हेवन हिल्स प्रकल्प तर महाराष्ट्रातील एक दर्जेदार प्रकल्प सिद्ध होईल यात शंका नाही असे उद्गार नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनीकाढले.”

“सिडको नेहमीच नवनवीन व दर्जेदार प्रकल्प व लोकोपयोगी प्रकल्प साकारले जातात. यापुढेदेखील शासनाच्या माध्यमातून व मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली सिडकोतर्फे अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रकल्प साकारण्यात येणार आहेत असे उद्गार उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांनी काढले.”

सदर गृहनिर्माण योजने अंतर्गत पोलीस कर्मचाऱ्यांकरिता नवी मुंबईतील तळोजा, खारघर, कळंबोली, घणसोली आणि द्रोणागिरी या पाच नोडमध्ये ४,४६६ सदनिका साकारण्यात येत आहेत. प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गट यांकरिता उपलब्ध असणाऱ्या या योजनेतील सदनिका या केवळ मुंबई महानगर क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांकरिताच राखीव आहेत. एकूण ४,४६६ सदनिकांपैकी १,०५७ सदनिका या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी आणि ३,४०९ या अल्प उत्पन्न गटासाठी उपलब्ध आहेत. या योजनेकरिता अर्जदारांची ऑनलाइन नोंदणी २७ जुलै २०२० ते २७ ऑगस्ट २०२० या कालावधीत होणार असून नोंदणीकृत अर्जदारांना २८ जुलै २०२० ते २८ ऑगस्ट २०२० या मुदतीत ऑनलाइन अर्ज भरावे लागणार आहेत. तर अनामत रक्कम आणि अर्जाचे शुल्क २८ जुलै २०२० ते २९ ऑगस्ट २०२० या कालावधीत भरता येणार आहे. योजनेची संगणकीय सोडत १५ सप्टेंबर २०२० रोजी काढण्यात येणार आहे.

सदर योजनेकरिता अर्जदारांची नोंदणी, शुल्क भरणा, सोडत इ. सर्व प्रक्रिया या  अत्यंत सुलभ व पारदर्शक अशा ऑनलाइन पद्धतीने पार पडणार आहेत. याकरिता https:// lottery. cidcoindia. com हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच योजनेसंबधीची विस्तृत माहिती, योजनेचे वेळापत्रक, आरक्षणनिहाय सदनिकांचा तपशील इ. तपशील हा ऑनलाइन योजना पुस्तिकेमध्ये देण्यात आला असून उपरोक्त संकेतस्थळावरच योजना पुस्तिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. योजना पुस्तिकेचे शुल्कही अर्जदारांनी ऑनलाइन भरावयाचे आहे. संपूर्ण ऑनलाइन पद्धतीने पार पडणार असणाऱ्या प्रक्रियेमुळे पोलीस अर्जदारांना सिडको कार्यालयास भेट देण्याची आवश्यकता असणार नाही. अधिकाधिक पोलीस कर्मचाऱ्यांनी अर्ज नोंदणी करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात येत आहे.    

या प्रसंगी सिडकोच्या विविध गृहनिर्माण योजनांतील ३,७६० यशस्वी अर्जदारांना वाटपपत्रांचे ऑनलाइन वापट आणि सिडकोच्या व्हर्च्युअल निवारा केंद्र या पोस्ट लॉटरी ऑनलाइन पोर्टलचे ई-अनावरणही मा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. सिडकोतर्फे देण्यात आलेल्या या व्हर्च्युअल निवारा केंद्राच्या सुविधेमुळे अर्जदारांना आता कागदपत्र पडताळणी व अपिलावरील सुनावणी या दोन महत्वाच्या गोष्टींसाठी व्यक्तिगतरित्या उपस्थित रहाण्याची आवश्यकता नाही. या दोन महत्वाच्या बाबीदेखील पूर्णतः ऑनलाईन माध्यमातून पार पाडण्याचा सिडकोने निर्णय घेतला आहे. यामुळे अर्जदार घरबसल्या अपिलाच्या सुनावणीसाठी ऑनलाईन माध्यमातून उपस्थित राहू शकणार आहे. सदर केंद्रातर्फे पार पाडण्यात येणाऱ्या सर्व प्रक्रिया या सुलभ, सुरक्षित व पारदर्शक अशा ऑनलाइन पद्धतीने पार पाडण्यात येत असल्याने अर्जदारांना निवारा केंद्राच्या किंवा सिडकोच्या कार्यालयास भेट न देता घरबसल्या या सेवा प्राप्त होणार असल्यामुळे अर्जदारांचा अमूल्य वेळ वाचण्याबरोबरच त्यांना कोविड – १९ या पॅनडेमिकच्या पार्श्वभूमीवर घरबसल्या सुरक्षितपणे या सेवांचा लाभ घेणे शक्य होणार आहे.

सिडकोच्या नवी मुंबईतील पारसिक टेकड्यांच्या निसर्गरम्य परिसरात साकारण्यात येत असलेल्या खारघर हेव्हन हिल्स या प्रकल्पाबद्दल माहिती देण्याऱ्या ध्वनीचित्रफितीचे सादरीकरणही यावेळी करण्यात आले. सिडकोतर्फे खारघर हिलच्या माथ्यावरील २५० एकरवर ‘खारघर हेवन हिल्स’ हा प्रकल्प प्रस्तावित आहे. मुंबई व नवी मुंबईतील वर्दळीपासून दूर असलेल्या खारघर टेकड्यांच्या शांत, सुंदर आणि निसर्गसंपदेने नटलेल्या या नयनरम्य परिसरात सिडकोतर्फे हा प्रकल्प साकारण्यात येत आहे. निसर्गाने समृद्ध असलेल्या या खारघर टेकड्यांवर साकारल्या जाणाऱ्या या प्रकल्पात निवासी व्हिला, रिसॉर्ट, नेचरोपॅथी सेंटर यांचा मुख्यत्वे समावेश आहे.

सध्या कोविड – १९ म्हणजेच कोरोना या पॅनडेमिकचा सर्व स्तरांवरून सामना करायचा प्रयत्न केला जात आहे. कोरोनाची ही साखळी तोडून या पॅनडेमिकचा प्रसार रोखण्यासाठी शासनातर्फे सर्वतोपरि शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाच्या अखेरीस लोकेश चंद्र यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड १९ करीता सिडकोतर्फे देण्यात येणाऱ्या रु. १ कोटी रकमेचा धनादेश मुख्यमंत्र्यांना सुपूर्द केला. कोविड-१९ विरुद्धच्या लढाईमध्ये राज्य शासनाला सहकार्य करण्यासाठी सिडकोतर्फे केलेली ही छोटीशी मदत आहे.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago
magbo system