Categories: Uncategorized

पुरातत्व विभागातील रोजंदारी कर्मचाऱ्यांना कमी करु नये : खा. मंडलिक

अॅड. महेश जाधव : Navimumbailive.com@gmail.com

कोल्हापूर : भारतीय पुरातत्व विभाग मंडळ अंतर्गत मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि पुणे जिल्हे येतात व या ठिकाणी सन २०१८ ते २०२० या कालावधीकरीता ३५० ठेकेदारी कामगारांची केंद्राकडून मंजूरी मिळाली असताना या कर्मचाऱ्यांना कोरोना लॅाकडाऊनमध्ये कामावरुन कमी करण्याचा आदेश जारी केल्याने या सर्वांवर बेरोजगारीची वेळ येणार असल्याकारणाने हा आदेश रद्द करावा म्हणून खासदार संजय मंडलिक यांनी भारतीय पुरातत्व खात्याच्या महासंचालक श्रीमती उषा शर्मा यांना तात़डीच्या निवेदनाद्वारे विनंती केली आहे.

दरम्यान, गेली कित्येक वर्षे रोजंदारी कामगार म्हणून काम करीत असताना त्यांचे वेतन विभागामार्फत मिळत होते. नोव्हेंबर २०१८, पासून ठेकेदारी पद्धत आली.   सबब, या  मंडळविभागात सन २०१८ -२०२० वर्षाकरिता ३५० ठेकेदारी कामगारांची केंद्राकडून मंजुरी मिळाली होती. परंतु एकाच वर्षात २०० मग १७० तसेच १६० तसेच १५० वर आणली व शेवटी ठेकेदारी कामगारांची संख्या १२१ वर आणली आहे.  सन २०२०-२१ वर्षाकरिता कामगार मंजुरी संख्या ३५० असून देखील सदर कामगार संख्या १२१ वर आणण्याचा कार्यालयीन आदेश काढल्याने या कर्मचाऱ्यांना बेरोजगार करण्याचा निर्णय घेवून त्यांचेवर एक प्रकारे अन्याय केला आहे.

सध्या देशात कोरोना महामारीचे संकट असताना पंतप्रधान यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणामध्ये ‘लॉकडाऊन काळात कोणत्याही संस्थेने व आस्थापनानी कामगारांना कामावरून काढू नये व सदर संकट काळात कामगारांचे संपूर्ण वेतन देण्यात यावे’ असे असताना लॅाकडाऊन कालावधीत पुरातत्व खात्याकडून घेतलेला निर्णय चुकीचा असून तो मागे घ्यावा व बेरोजगारीच्या संकटातून या कर्मचाऱ्यांना वाचवावे असेही या निवेदनात म्हटले आहे.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago