Categories: Uncategorized

पालिका निवडणूकीत पक्षातून तिकिट वाटपात डावलले जाणाऱ्या महत्वाकांक्षीना मनसेचा आधार?

अनंतकुमार गवई

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या सहाव्या सार्वत्रिक निवडणूकीत प्रत्येक प्रभागात मोर्चेबांधणीस सुरूवात झाली आहे. महाआघाडीमुळे शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस हे तीन पक्ष एकत्रित आल्याने भाजपला कितपत शह देतील याबाबत आताच सांगणे अवघड आहे. तथापि महाआघाडी व भाजपच्या तुलनेत मनसेला यंदा प्रथमच सुगीचे दिवस येणार असल्याचे चिन्ह निर्माण झाले आहे. महाआघाडीमुळे डावलले जाण्याची शक्यता असणाऱ्या निवडणूक लढवू पाहणाऱ्या महत्वाकांक्षी राजकारण्यांनी आतापासूनच मनसेच्या तिकिटासाठी चाचपणी सुरू केली आहे.

सध्या भाजप महापालिकेत सत्तेवर असली तरी निवडणूका जवळ आल्यावर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर पडझड होण्याची शक्यता आहे. गणेश नाईकांसोबत भाजपमध्ये आलेले अनेक नगरसेवक पुन्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेत जाण्याची शक्यता असून महापालिका मुख्यालयात उघडपणे याबाबत चर्चा होत आहे. भाजपच्या नगरसेवकांनी निवडणूकीसाठी अन्य ठिकाणी घरोबा करण्याच्या सुरू केलेल्या हालचाली आणि महाआघाडीची जय्यत तयारी त्यामुळे महापालिकेवर असलेले कमळ काही काळापुरतेच राहण्याची भीती आता भाजपच्या कार्यकर्त्याकडून व पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जावू लागली आहे.

राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्यांनाच पुन्हा तिकिटी मिळणार असल्याचे निश्चित झाल्याने आम्ही किती काळ नुसत्या खुर्च्या उचलायच्या आणि झेंडे घेवून नाचायचे व बॅनरवर खर्च करायचा असा उघड सवाल आता राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या मातब्बरांकडून विचारला जात आहे. त्यामुळे निवडणूक लढवू पाहण्यासाठी जय्यत तयारी केलेल्या या महत्वाकांक्षी असंतुष्ठ आत्म्यांनी अन्य पक्षातून निवडणूक लढविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. हा नाईकांच्या नवी मुंबई गडासाठी धोक्याचा इशारा मानला जात आहे. त्यातच नाईकांचा एक मातब्बर समर्थक शिवसेनेत कोणत्याही क्षणी दाखल होणार असल्याने ‘जे सोडून जातात, त्यांनाच आजवर दादांनी ताकद दिली आणि आमच्याकडे केवळ खुर्च्या लावण्याचे काम आले असल्याची नाराजी नाईक समर्थक उघडपणे व्यक्त करत आहेत.

भाजपमधील नाराज महत्वाकांक्षी (यात नाईक समर्थकांचाच समावेश अधिक आहे) महाविकासआघाडी व त्यानंतर मनसेकडून निवडणूक लढविण्यासाठी मोर्चेबांधणी करू लागले आहे. विधानसभा निवडणूकीत ऐरोली व बेलापुरात मनसेला मिळालेल्या मतांची प्रभागातील आकडेवारी व आपली हमखास मते पाहून महत्वाकांक्षींमध्ये मनसेतून आपण आरामात जिंकू शकतो, असा विश्वास उघडपणे व्यक्त केला जावू लागला आहे. त्यामुळे २०१०च्या निवडणूकीमध्ये मनसेचा खातेफलक कोरा राहिला होता. २०१५ मध्ये मनसेने महापालिका निवडणूक लढविली नव्हती. पण आता मनसेसाठी खऱ्या अर्थाने सुगीचे दिवस येवू लागले आहेत. किमान ५ ते ६ नगरसेवक उघडपणे आरक्षणात आपला बळी गेल्याचे स्पष्ट झाल्यावर अन्य प्रभागातून मनसेतून पालिकेत जाण्याची मोर्चेबांधणी करू लागले आहेत. त्यातच महाविकासआघाडीत तसेच भाजपातही तिकीटीत अन्याय होणार असल्याचे गृहीत धरून अनेकांनी मनसेचा दरवाजा ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. एकंदरीत मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळेंना मनसेचे नगरसेवक सभागृहात घेवून जाण्याचा प्रथमच मान मिळणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago