Categories: Uncategorized

पालकमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते प्रभाग ७९ मध्ये ७ मार्च रोजी विविध कामांचे भूमीपुजन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३

स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील प्रभाग ७९ मध्ये ७ मार्च विविध नागरी कामांचे भुमीपुजन ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होत असून शिवसेनेच्या स्थानिक माजी नगरसेविका रूचा रामचंद्र पाटील यांनी या कामासाठी महापालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.

७ मार्च रोजी सांयकाळी ५ वाजता सानपाडा सेक्टर ५ मधील भुखंड क्रं ३ झाशीच्या राणी मैदानावर या कार्यक्रमाचे भूमीपुजन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होत आहे. प्रभाग ७९ मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट पीच व व्हॉली बॉल, फुटबॉल, कबड्डीसाठी कोर्ट, विद्युत व इतर सुविधांच्या कामाचा या भुमीपुजन कार्यक्रमात समावेश आहे. पालकमंत्री  एकनाथ शिंदे यांच्यासमवेत या कार्यक्रमाला खासदार  राजन  विचारे, शिवसेना उपनेते विजय नाहटा, शिवसेना जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले, माजी सिडको संचालक नामदेव भगत, शिवसेनेचे माजी पालिका गटनेते द्वारकानाथ भोईर, शिवसेना जिल्हा महिला संघठक सौ. रंजना  शिंत्रे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अॅड. मनोहर गायखे, मिलिंद सुर्यराव, शहरप्रमुख विजय माने, शिवसेनेचे माजी ज्येष्ठ नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.माजी नगरसेविका रूचा पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे होत असलेल्या विकासकामांच्या भुमीपुजन कार्यक्रमास सानपाडावासियांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कार्यक्रमाचे निमत्रंक शिवसेना उपविभागप्रमुख रामचंद्र शंकर पाटील यांनी केले आहे.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago
magbo system