Categories: Uncategorized

पनवेल मनपा कंत्राटी कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान द्यावे – कंत्राटी महासंघ

संदीप खांडगेपाटील / ८३६९९२४६४६/९८२००९६५७३/ Navimumbailive.com@gmail.com

सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे आयुक्तांना निर्देश
पनवेल : पनवेल महानगरपालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिवाळी निमित्त सानुग्रह अनुदान द्यावे अशी जोरदार मागणी महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघाचे मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी यांनी महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे प्रत्यक्ष भेट घेऊन केली आहे.
यावेळी मुलाणी म्हणाले की, पनवेल महानगरपालिकेमधील अनेक कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिवाळी सानुग्रह अनुदान मिळाला नाही, असे समजते. पण, कंत्राटी कर्मचारी हा कायम कर्मचारी इतकेच किंबहुना त्याहून थोडे अधिकचे काम करत असतो. ही वस्तूस्थिती आहे. त्यातल्या त्यात कोविड – १९ कोरोना विषाणूच्या महामारीत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता अधिकचे काम केले आहे. त्यात सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत येणाऱ्या कंत्राटी कर्मचारी – नर्स, डॉक्टर, आशा वर्कर्स आदी कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाच्या माझे कुटुंब, माझी जवाबदारी या महिमेत जोरदार पणे काम केले आहे. त्या अनुषंगाने कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिवाळी सानुग्रह अनुदान मिळणे आवश्यक असून त्याच बरोबर कोविड भत्ता देखील मिळाला पाहिजे अशी मागणी महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघाचे मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली असता आयुक्त पनवेल महानगरपालिका यांना कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिवाळी निमित्त सानुग्रह अनुदान द्यावे असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे मनपा कर्मचाऱ्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून महानगरपालिका काय कार्यवाही करते ते पाहणे औचित्याचे ठरणार आहे. तसेच या बाबतीत पनवेल विधानसभा आमदार प्रशांत ठाकूर व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनाही सदरहू निवेदन देण्यात आले असल्याची माहिती महासंघाने दिली आहे. त्या अनुषंगाने कोणताही कंत्राटी कर्मचारी सानुग्रह अनुदानापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी असे मुलाणी म्हणाले.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago