Categories: Uncategorized

नेरूळ सेक्टर ८ व ८ अ मधील बकाल व अविकसित भुखंडाची सफाई करा : सौ. सुनिता रतन मांडवे

नवी मुंबई : महापालिका प्रभाग ८७ मधील बकाल व अविकसित भुखंडाची सफाई करण्याची लेखी मागणी शिवसेनेच्या माजी नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.

महापालिका प्रभाग ८७ मध्ये नेरूळ सेक्टर ८ व ८ अ मध्ये माणक हॉस्पिटलजवळील भुखंड तसेच संजीवनी, उन्नती, त्रिमूर्ती व शिवनेरी अपार्टंमेंट या अपार्टमेंटच्या मागील बाजूस सिडकोच्या अखत्यारीत असलेल्या भुखंडाच्या बकालपणामुळे स्थानिक नागरीकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. हे भुखंड अविकसित अवस्थेत असून तेथे कचऱ्याचे, डेब्रिंजचे ढिगारे, रॅबिटचे ढिगारे  आहेत. या भुखंडावर जंगली झुडूपे, गवत वाढीस लागले आहे. या अविकसितत भुखंड व तेथील जंगली झुडूपे यामुळे संबंधित गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये साप, नाग व अन्य सरपटणाऱ्या प्राण्यांचा सामना करावा लागत आहे. तेथील रहीवाशांच्या सदनिकामध्ये साप, नागाचे दर्शन होवू लागले आहे. त्यामुळे येथे जिवितहानी होण्याची भीती  आहे. या भुखंडाची सफाई आम्ही वेळोवेळी कधी महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून तर कधी स्वखर्चातून सफाई केलेली आहे. स्थानिक रहीवाशांना डासांचा व साथीच्या आजाराचाही या अविकसित भुखंडामुळे सामना करावा  लागलेला आहे. समस्येचे गांभीर्य व स्थानिकांकडून केली जाणारी आग्रही मागणी पाहता आपण संबंधितांना शक्य तितक्या लवकर संबंधित अविकसित भुखंडाच्या सफाईचे निर्देश द्यावेत, अशी मागणी सौ. सुनिता रतन मांडवे यांनी केली आहे.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago