कामगार नेते रवींद्र सावंत यांनी केले या कोर्टचे उद्घाटन
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर ४ येथील महापालिका विभाग कार्यालयासमोरील क्रिडांगणावर व्हॉली बॉल कोर्टचे उद्घाटन कामगार नेते व नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते रवींद्र सावंत यांच्या हस्ते रविवारी, दि. १० जानेवारी रोजी सांयकाळी ५ वाजता झाले. यावेळी स्थानिक रहीवाशी व मुले तसेच गृहनिर्माण सोसायटीचे पदाधिकारी उपस्थित होते.
स्थानिक परिसरातील मुलांनी कॉंग्रेसचे नेते रवींद्र सावंत आणि नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव विद्या भांडेकर यांच्याजवळ परिसरात व्हॉली बॉल खेळण्यासाठी कोर्ट उपलब्ध नसल्याची खंत व्यक्त करत व्हॉली बॉल खेळण्यास आपली गैरसोय होत असल्याची तक्रार केली होती. यावर क्रिडाप्रेमी असणारे रवींद्र सावंत यांनी सेक्टर ४च्या क्रिडांगणावर स्थानिक मुलांना व्हॉली बॉल खेळता यावा यासाठी व्हॉली बॉल कोर्टची निर्मिती केली व त्यांचेच उद्घाटन रविवारी सांयकाळी कामगार नेते रवींद्र सावंत यांच्या हस्ते झाले. यावेळी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव विद्या भांडेकर, विभागातील ज्येष्ठ नागरिक अशोक महाजन, नानोटी, इंदरसिंग ठाकूर, किशोर रामाणे, योगेश पाटील, श्री रॉय, रमेश सिंग, टोनि , फिरोज यांच्यासह स्थानिक परिसरातील मुले, रहीवाशी व गृहनिर्माण सोसायटीचे पदाधिकारी उपस्थित होते.
संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज पनवेल :…
देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…
नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…
संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल : भाजपचे नगरसेवक तथा…
संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना महामारीच्या साथीने पुन्हा…