Categories: Uncategorized

नेरूळ सेक्टर २ एलआयजी वसाहतीत कॉंग्रेसचे मास्क वाटप

संपर्क : ९८२००९६५७३ / Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : नेरूळ सेक्टर  दोन परिसरात महापालिका प्रशासनाकडून कोरोना चाचणीचा कार्यक्रम ठेवण्यात आला असताना त्या ठिकाणी व सभोवतालच्या परिसरात मंगळवारी (दि. २२ सप्टेंबर) कॉंग्रेसच्या वतीने मास्क वाटप करण्यात आले.

नेरूळ सेक्टर दोनमधील एलआयजी या श्रमिकांच्या वसाहतीमधील आम्रपाली सोसायटीमध्ये महापालिका प्रशासनाकडून अॅण्टीजेन  व आरटीपीसीआर या दोन कोरोना चाचण्यांचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी येणाऱ्या रहीवाशांना कॉंग्रेसच्या जिल्हा सचिव विद्या भांडेकर व शेवंता मोरे यांच्या वतीने मास्क वाटप करण्यात आले. या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी गजानन टाळे, बापू शिंदे उपस्थित होते.

घरातील महिलांनी कपड्यापासून तयार केलेले मास्क कोरोना चाचणी कार्यक्रमात तसेच सभोवतालच्या परिसरातही वाटण्यात आले. मास्क वाटपातून एलजीआयतील रहीवाशांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी हे मास्क उपयुक्त ठरतील व घरातील महिलांना कुटीरोद्योगाची  संधीही उपलब्ध होणार असल्याची माहिती कॉंग्रेसच्या सचिव विद्या भांडेकर यांनी दिली.  यावेळी स्थानिक रहीवाशांनी कॉंग्रेसच्या या उपक्रमाची प्रशंसा केली. यावेळी आम्रपाली असोसिएशनचे पदाधिकारीही उपस्थित होते. कोरोना चाचणी अभियान राबविण्याकरिता आम्रपालीच्या पदाधिकाऱ्यांनी व रहीवाशांनी मोलाचे सहकार्य केले.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago
magbo system