Categories: Uncategorized

नेरूळ सेक्टर १६ ए महापालिका शाळेच्या मागील बाजूस असलेल्या गर्दुल्याचा बंदोबस्त करण्याची मागणी

नवी मुंबई : नेरूळ सेक्टर १६ ए येथे महानगरपालिकेची वत्सलाबाई रामा भगत ही शाळेच्या मागील बाजूस असलेला गर्दुल्याचा वाढता वावर आणि दारूच्या बाटल्यांचा बाराही महिने पडलेला खच या पार्श्वभूमीवर प्रभाग ९६च्या नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत व गणेशदादा भगत यांनी नेरूळ पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांना लेखी निवेदन देवून साकडे घातले आहे.

या शाळेच्या मागील बाजूस मातीचे ढिगारे तसेच अन्य कचरा पडलेला आहे. दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला आहे. या ठिकाणी गर्दुल्यांचा वावर बाराही महिने दिसून येत आहे. या शाळेच्या मागील बाजूस असलेला बकालपणा,, दारूच्या बाटल्यांचा पसारा, गर्दुल्यांचा वाढता वावर परिसराला भूषणावह नाही.  शाळेच्या जवळपास व मागील बाजूस खुलेआमपणे गर्दुले नशापाणी करत असल्याने विद्यार्थ्याच्या तसेच पालकांच्या आणि स्थानिक रहीवाशांच्या जिविताला धोका निर्माण झालेला आहे. आपण या ठिकाणी पोलीस गस्त वाढवून गर्दुल्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी गणेशदादा भगत व नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत यांनी केली आहे.

प्रभागात पोलीस चौकी व्हावी आणि गस्त वाढवावी तसेच परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत करावी यासाठी नगरसेविका रूपाली किसमत यांनी पालिका प्रशासन व पोलिस आयु्क्तांकडे सतत पाठपुरावा केला आहे. पामबीच मार्गला समांतर असणाऱ्या सर्व्हिस रोडवरही सुरक्षा वाढवावी याबाबतही पाठपुरावा केलेला आहे.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago