Categories: Uncategorized

नेरूळ पश्चिमच्या आठ प्रभागात शिवसेनेची प्रबळ दावेदारी

अनंतकुमार गवई- भाग १, नवी मुंबई निवडणूक वार्तापत्र

नवी मुंबई : वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात मंगळवारी महाआघाडीच्या कार्यकर्त्याच्या भरलेल्या मेळाव्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवी मुंबई महापालिका निवडणूकीत यश मिळविण्यासाठी महाआघाडीच्या कार्यकर्त्यांनी तडजोड करायला शिका असा संदेश दिला. नेरूळ पश्चिममधील महापालिकेच्या आठही प्रभागात सध्या शिवसेनेची प्रबळ दावेदारी पाहता अजित पवारांनी दिलेला तडजोडीचा सल्ला हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या व कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना मान्य करावा लागण्याची चिन्हे निर्माण झालेली आहेत.

नेरूळ पश्चिममध्ये पामबीच मार्गाने प्रवेश केल्यावर सुरुवातीला प्रभाग ८५ सुरु होतो. या ठिकाणी सध्या भाजपच्या नगरसेविका सौ. सुजाता सुरज पाटील या आहेत. सुरूवातीला त्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून निवडून आल्या. गणेश नाईकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यावर सुजाता पाटील यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. सध्या हा प्रभाग खुला झाला असून या जागेवर विद्यमान नगरसेविका सुजाता पाटील यांच्याएवजी गणेश नाईकांचे निकटवर्तीय समर्थक व महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक सुरज पाटील निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे. या प्रभागातून निवडणूक लढविण्यासाठी शिवसेनेचे स्थानिक भागातील ज्येष्ठ नेते गणपत शेलार हे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. महाआघाडीतील कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे शेलारांच्या तोडीस तोड तुल्यबळ उमेदवार नसल्याने शेलारांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. सर्वच जागा शिवसेनेकडे जाणार असतील तर गणपत शेलारांना राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करून महाआघाडीतून त्यांना लढविण्याची खेळी अंतिम टप्प्यात खेळली जाण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीने ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने  मातब्बर उमेदवारांची अदलाबदल होण्याची दाट शक्यता आहे. प्रभाग ८५ मध्ये सध्याच्या पुनर्रचनेनुसार नेरूळ सेक्टर सहा व सारसोळे गावची मतदारसंख्या कुकशेतच्या तुलनेत अधिक असल्याने शेलारांसाठी ती जमेची बाजू ठरू शकते.

प्रभाग ८६ मध्ये भाजपच्या विद्यमान नगरसेविका जयश्री ठाकूर या असून त्यांनी गणेश नाईकांसमवेत राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून भाजपात प्रवेश केला आहे. या प्रभाग पूर्वी अनुसूचित जमातीसाठी राखीव असल्याने कुकशेत गावातील जयश्री ठाकूरांची या प्रभागातून लॉटरी लागली. आता प्रभाग ओबीसी राखीव झाल्याने भाजपमधून मनोज मेहेर यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. सारसोळे गावातील या प्रभागातील सर्वाधिक मतदान पाहता आणि गेल्या १२ वर्षापासून मनोज मेहेर सारसोळे गावासाठी व नेरूळ सेक्टर सहामधील विकासासाठी घेत असलेले परिश्रम पाहता आणि माजी आमदार संदीप नाईक तसेच बेलापुरच्या विद्यमान आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्याशी मनोज मेहेरची सलगी पाहता मनोज मेहेरची या प्रभागातून भाजपकडून उमेदवारी निश्चित मानली जात आहे. शिवसेनेकडून प्रल्हाद पाटील यांचे नाव चर्चेत आहे. प्रल्हाद पाटील यांच्या तुलनेत या प्रभागात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे मातब्बर उमेदवार नसल्याने त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. या प्रभागातून आपणालाच उमेदवारी मिळावी यासाठी शिवसेनेचाच एक ग्रामस्थ नगरसेवक जोरदार तयारी करत असल्याची सूत्रांची माहिती आहे.

प्रभाग ८७ मधून शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे आहेत. यापूर्वी या प्रभागातून नगरसेविका मांडवे यांचे यजमान रतन नामदेव मांडवे हे पाच वर्ष नगरसेवक होते. त्यातच आता महाआघाडीची उमेदवारी मांडवे परिवारासाठी लाभदायी मानली जात आहे. भाजपकडून या प्रभागातून गणेश रसाळ प्रबळ दावेदार मानले जात आहे.

प्रभाग ९४ मध्ये सध्या श्रध्दा गवस या भाजपच्या नगरसेविका असून मागील निवडणूकीत त्या अपक्ष म्हणून निवडून आल्या होत्या. त्यामागे त्यांचे दीर व स्थानिक भागातील नेते प्रदीप गवस यांची भूमिका महत्वाची ठरली होती. गवस परिवाराने भाजपमध्ये प्रवेश केला. आता हा प्रभाग खुला झाला असल्याने त्या जागेवर भाजपकडून प्रदीप गवस यांची उमेदवारी निश्चित मानली जात असतानाच भाजपकडून रमेश शिंदे, सुरज पाटील यांचीही नावे गेल्या काही या प्रभागातून चर्चेला येवू लागली आहेत. महाविकास आघाडीकडून निवडणूक लढविण्यासाठी शिवसेनेकडून दिलीप घोडेकर प्रबळ दावेदार मानले जात आहे. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश भोर हेही येथून निवडणूक लढविण्यासाठी उत्सूक आहेत. घोडेकर हे या प्रभागातील माजी नगरसेवक असून पालिकेत त्यांनी विरोधी पक्षनेतेपदही सांभाळलेले आहे. त्यामुळे राजेश भोर यांच्या तुलनेत घोडेकरांचा दावा प्रबळ मानला जात आहे.

(उद्याच्या भागात नेरूळ पश्चिममधील नामदेव भगत, गिरीश म्हात्रे, काशिनाथ पवार व रूपाली भगत यांचे चार प्रभाग)

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago