Categories: Uncategorized

नेरूळ-जुईनगरमधील महिलांसाठी कॉंग्रेसचे मोफत क्लासेस

स्वयंम न्युज ब्युरो : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३

नवी मुंबई: महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वत:च्या पायावर उभे राहता यावे, महागाईच्या काळात कुटूंबाच्या उत्पन्नामध्ये महिलांचा हातभार लागावा, महिलांनी स्वावलंबी बनावे, पैशासाठी कोणावर अवलंबून राहू नये यासाठी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते रवींद्र  सावंत  यांच्या संकल्पनेतून नवी मुंबई कॉंग्रेसच्या जिल्हा सचिव  विद्या भांडेकर यांच्या माध्यमातून नेरूळ तालुका कॉंग्रेसच्यावतीने महिलांसाठी विविध क्लासेस आयोजन करण्यात आले आहे. या क्लासेसच्या माध्यमातून महिलांना मोफत प्रशिक्षण दिले जाणार असून महिलांनी अर्थकारणातही सक्षम होवून आपला स्वतंत्र ठसा  उमटवावा हाच या  प्रशिक्षणामागील हेतू  असल्याची माहिती उपक्रमाच्या आयोजन विद्या भांडेकर यांनी दिली.

नेरूळ सेक्टर दोनमधील दत्तात्रेय सोसायटीमधील कॉंग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयात १ डिसेंबरपासून या अभिनव उपक्रमास सुरूवात होत असून यामध्ये महिलांना शिवण क्लास, मेंहदी क्लास, बेसिक पार्लर क्लास, कुकरी क्लास आदींचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जुईनगर व नेरूळमधील महिलांनी या उपक्रमात मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्याचेआवाहन विद्या भांडेकर यांनी केले आहे. या प्रशिक्षणाचा लाभ  घेवू इच्छिणाऱ्यांनी विद्या भांडेकर – ९७०२६०५३२१, ८३६९४२१२३२, पूनम कांबळे – ८३६९४६९१९६ यांच्याशी संपर्क साधावा.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago