Categories: Uncategorized

नेरूळमध्ये साई जनसेवा प्रतिष्ठानचा गुरूवारी साईभंडारा

नवी मुंबई : नेरूळ सेक्टर २ येथे साई जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने गुरूवार, दि. २० फेब्रुवारी रोजी साई भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. १९ फेब्रुवारी रोजी साईंच्या पादुका पुजन व पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

अमरदीप अपार्टंमेट, आदर्श अपार्टमेंट व एलआयजीमधील रस्ता या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी साई भंडारा आयोजित करण्यात आला असून १९ फेब्रुवारी रोजी सांयकाळी ७ वाजता साईंच्या पादुका पुजनानंतर साईंबाबांचा पालखी सोहळा नेरूळमध्ये काढण्यात येणार आहे. २० फेब्रुवारी रोजी सांयकाळी ६ वाजता साईंचा अभिषेक, ७ वाजता महाआरती, ८ वाजल्यापासून भाविकांसाठी महाप्रसाद,  तसेच याचवेळी सुस्वर भजनाही कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.

शिवसेना विभागप्रमुख व माजी नगरसेवक रतन मांडवे हे साई जनसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक असून शिवसेना नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे या जनसेवा प्रतिष्ठानच्या विश्वस्त आहेत. या भंडाऱ्यात व पालखी सोहळ्यात साई भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन साई भंडाऱ्याचे आयोजक मनोज चव्हाण यांनी केले आहे.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago