Categories: Uncategorized

नेरूळच्या रेल्वे रूळावरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पादचारी पुलाचे लोकार्पण उत्साहात

नवी मुंबई : ठाणे लोकसभा शिवसेना खासदार राजन विचारे यांच्या हस्ते नेरूळ येथील पूर्व आणि पश्चिमला जोडणार्‍या रेल्वे रूळावरील  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पादचारी पुलाचा लोकार्पण सोहळा  रविवारी सकाळी उत्साहात पार पडला. यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते व माथाडी नेेते शशिकांत शिंदे, कै. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष व माथाडी नेते नरेंद्र पाटील, शिवसेना उपनेते व  मुंबई झोपडपट्टी सुधार समिती महामंडळाचे अध्यक्ष विजय नाहटा, काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे ऐरोली विधानसभेचे नेते गणेश शिंदे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप घोडेकर, संतोष घोसाळकर, उपशहरप्रमुख मनोज इसवे, नगरसेवक काशिनाथ पवार, माजी नगरसेवक सतीश रामाणे, शिवसेना विभागप्रमुख संजय भोसले, अरूण गुरव, तानाजी जाधव, उपविभागप्रमुख दिपक शिंदे हे या कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. धोकादायक असलेल्या या पादचारी पुलाची दुरूस्ती व्हावी यासाठी रेल्वे, सिडको, महापालिका प्रशासनाकडे सतत पाठपुरावा करणार्‍या शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी या कामाचेे श्रीफळ वाढवून कार्यक्रमास सुरूवात केली. कार्यक्रमामध्ये प्रास्तविकपर भाषणात शिवसेना विभागप्रमुख व माजी नगरसेवक रतन नामदेव मांडवे यांनी रेल्वे रूळावरील पादचारी पुलाची झालेली दुरावस्था, केलेला पाठपुरावा, पुल उभारणीचा इतिहास, सातत्याने रेल्वे, सिडको, महापालिका प्रशासनाकडे केलेला लेखी पाठपुरावा, भेटीगाठी याबाबतचा सविस्तर वृत्तांत कथन करत उपस्थितांसमोर सत्य परिस्थिती मांडली. ज्येष्ठ नागरिकांसाठी पुलावर थेट जाण्यासाठी लिफ्टची व्यवस्था करण्याविषयी मांडवे यांनी खासदारांकडे स्थानिक जनतेच्या वतीने साकडे घातले.यावेळी शिवसेना उपनेते विजय नाहटा  यांनी आपल्या भाषणात, खासदार राजन विचारे यांच्या माध्यमातून नवी मुंबई कार्यक्षेत्रात रेल्वे व अन्य समस्यांचे निवारण कसे व कोठे होत गेले याचा गोषवारा घेत नगरसेविका  सौ. सुनिता मांडवे व माजी नगरसेवक रतन मांडवे यांच्या माध्यमातून प्रभागात झालेली विकासकामे व समस्या सोडविण्यासाठी करत असलेल्या पाठपुराव्याची माहिती दिली. या पुलाची आपण स्वत: व खासदार राजन विचारे यांनी पाहणी केली व प्रशासनाच्या निदर्शनास समस्येचे गांभीर्य आणून दिल्याची माहिती यावेळी विजय नाहटा यांनी दिली.यावेळी खासदार राजन विचारे यांनी आपण नवी मुंबईत विकासकामे करण्यासाठी धडपडणार्‍या व विकासासाठी पाठपुरावा करणार्‍या नवी मुंबईतील नगरसेवकांना साथ दिलेली आहे. नवी मुंबईतील नगरसेवकांनी सुचविलेल्या महत्वपूर्ण कामांना दिल्ली दरबारातून न्याय देण्याचा प्रयत्न केला. अलिबागचा जलवाहतुक प्रकल्पासाठी केलेेल्या कामाचा उल्लेख यावेेळी केला. या पादचारी पुलाची पाहणी, डागडूजी हा विषय हाताळण्यात व मार्गी लावण्यात आपण मांडवे परिवाराला सहकार्य करण्यात कधीही हात आखडता घेतला नसल्याचे खासदार राजन विचारे यांनी यावेळी सांगितले.स्थानिक नगरसेविका व कार्यक्रमाच्या आयोजिका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी उपस्थितांचे आभार मानले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवसेना उपविभागप्रमुख संतोष  थोरात यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसेना महिला विभाग संघठक सौ. शलाका शरद पाजंरी, उपविभाग संघठक सौ. शुभांगी शंकर परब, शिवसेना शाखाप्रमुख गणेश कुलकर्णी, महिला शाखासंघठक सौ. जयश्री रवींद्र बेळेे, उपशाखाप्रमुख मंगेश शिवतरकर, अनुभव बेळे, युवा सेनेचे उपशहर युवा अधिकारी बेलापुर विधानसभा निखिल मांडवे, शरद पाजंरी, प्रकाश वाघमारे, प्रकाश कारभार, संतोष अभंग, शंकर पडवळ, बाबाजी चांदे, गौतम शिरवाळे, शंकर परब, सुरेश इपथे, सौ. संगीता चांदे, सौ. शीतल तांडेल, सौ. कविता कुलकर्णी, घाडगे, साळुंखे आदींनी परिश्रम घेतले.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago