Categories: Uncategorized

नेरुळ प्रभाग ८७ मध्ये शिवसेनेकडून गृहनिर्माण सोसायट्यांना फूट स्टेपिंग सॅनिटायर्झसचे वितरण

नवी मुंबई : कोरोना काळात गेल्या अडीच महिन्यात प्रभाग ८७ मधील रहीवाशांची  काळजी घेताना शिवसेना माजी नगरसेविका व शिवसेना उपशहरसंघठक सौ. सुनिता रतन मांडवे, विभागप्रमुख रतन  मांडवे, शाखाप्रमुख गणेश कुलकर्णी यांच्याकडून सातत्याने विविध लोकोपयोगी कामाचा धडाका लावण्यात आला आहे. गरजूंना धान्य वाटप, प्रभागात जंतुनाशक फवारणी, गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये सॅनिटायर्झसची फवारणी आदी कामे सुरू असतानाच गेल्या तीन दिवसापासून गृहनिर्माण सोसायट्यांना फूट स्टेपिंग सॅनिटायर्झसचे वितरण करण्यात येत आहे. शिवसेना माजी नगरसेविका व शिवसेना उपशहरसंघठक सौ. सुनिता रतन मांडवे, विभागप्रमुख रतन  मांडवे, शाखाप्रमुख गणेश कुलकर्णी यांच्या माध्यमातून प्रभाग ८७ मधील नेरूळ सेक्टर ८ व १० मधील रहीवाशांच्या सुरक्षिततेसाठी हा लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात आला.

कोरोना काळात  रहीवाशांची काळजी घेताना शिवसेना शाखा ८७च्या वतीने तसेच मांडवे परिवाराकडून रहीवाशांना त्यांच्या सोसायटी आवारातच भाज्या उपलब्ध करून देण्यात आल्या. त्यानंतर गृहनिर्माण सोसायट्यांच्या बाहेरील व अंर्तगत भागात सॅनिटायर्झसची फवारणी करण्यात आली. प्रभागात कोरोना रूग्ण आढळल्यास पुन्हा फवारणीसाठी महापालिकेकडे पाठपुरावा, कोरोना रूग्णांची काळजी व त्यांच्या परिवाराची विचारपुस, रूग्णवाहिकेसाठी धावपळ मांडवे परिवाराकडून  सतत करण्यात येत आहे.

आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रत्येक गृहनिर्माण सोसायटीला सोसायट्यांना फूट स्टेपिंग सॅनिटायर्झसचे वितरण करण्यास सुरूवात केली आहे. कोरोना काळात स्थानिक जनतेच्या आरोग्य रक्षणासाठी जे जे लागेल , ते सर्व  पुरविण्यासाठी आम्ही तयार आहोत, जनतेने घराबाहेर पडू नये असे आवाहन करताना फूट स्टेपिंग सॅनिटायर्झस हा उपक्रमही त्याच प्रयत्नाचा एक भाग असल्याची माहिती शिवसेना माजी नगरसेविका व शिवसेना उपशहरसंघठक सौ. सुनिता रतन मांडवे, विभागप्रमुख रतन  मांडवे, शाखाप्रमुख गणेश कुलकर्णी यांनी संयुक्तपणे दिली.

या वेळी शरद पाजंरी, गौतम शिरवाळे, राजू प्रभू, शाखाप्रमुख गणेश कुलकर्णी, उपशहरसंगठक व माजी नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे, विभागप्रमुख रतन मांडवे तसेच स्थानिक गृहनिर्माण सोसायटीतील पदाधिकारी व रहीवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago