Categories: Uncategorized

निवडणूक अनिश्चिततेमुळे प्रस्थापितांसह इच्छूकांचेही देव पाण्यात!

स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com

संदीप खांडगेपाटील : ८३६९२४६४६ – ९८२००९६५७३

नवी मुंबई : कोरोनाने पुन्हा जोमाने डोके वर काढू लागल्याने नवी मुंबई महानगरपालिकेची सहावी सार्वत्रिक निवडणूक पुन्हा काही कालावधीकरता लांबणीवर पडणार असल्याची जोरदार चर्चा प्रशासकीय पातळीवर सुरू झाल्याने निवडणूक लढवू पाहणाऱ्या प्रस्थापितांसह इच्छूकांचे धाबे दणाणले आहेत. निवडणूका लांबणीवर पडल्यास मतदारांना आकर्षित करण्यासाठी खर्च करण्यासाठी निधी परत कोठून आणायचा यामुळे संबंधितांचे धाबे दणाणले आहे. महापालिका निवडणूक कार्यक्रम अनिश्चिततेच्या शक्यतेने प्रस्थापितांसह इच्छूकांनी देव पाण्यात ठेवले असल्याचे प्रभागाप्रभागात पहावयास मिळत आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेची सहावी सार्वत्रिक निवडणूक एप्रिल २०२० मध्ये होणार होती. तथापि कोरोना महामारीमुळे निवडणूका तब्बल वर्षभर लांबणीवर पडल्या आहेत. या काळात कोरोना महामारीचा उद्रेक झालेला असतानाही निवडणूका डोळ्यासमोर ठेवून प्रस्थापितांनी तसेच निवडणूक लढवू पाहणाऱ्या इच्छूकांनी जीवाचे रान करून स्थानिक रहीवाशांच्या पर्यायाने मतदारांच्या गळ्यातील ताईत बनण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्नही केला होता. लिम्सीच्या गोळ्या वाटणे, मास्क वाटणे, सॅनिटायझर्सचे वाटप, धुरीकरण, आर्सेनिक ३० या रोगप्रतिकारक गोळ्यांचे वितरण, धान्याचे वाटप, कोरोनाग्रस्तांना रूग्णालयात प्रवेश मिळवून देणे, आयसीयूमध्ये प्रवेश मिळवून देणे, व्हॅनटिलेटर उपलब्ध करून देणे, अगदी कोरोनाने मृत्यू झाल्यास रूग्णवाहिका ते स्मशानभूमीपर्यतची तजवीज करणे, कोरोनाने मृत झालेल्यांच्या घरी जावून सांत्वन करणे, कोरोना रूग्णांच्या गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारात सतत जंतुनाशक फवारणी, स्वस्त दरात भाज्यांची, फळाची, धान्याची विक्री यासह शेकडो उपक्रम प्रभागाप्रभागातील कानाकोपऱ्यात, चौकाचौकात प्रस्थापितांसह निवडणूक लढवू पाहणाऱ्या इच्छूकांकडून सातत्याने राबविण्यात आले. हे समाजकार्य करताना अनेकांना कोरोनाचीही लागण झाली. कोरोनातून बरे होताच निवडणूक लढवू पाहणारे हे घटक पुन्हा जनसेवेत व्यस्त झाल्याचे पहावयास मिळाले. या काळात कोरोनाच्या भीतीने गावी पळून गेलेले काही प्रस्थापित तसेच इच्छूक राजकीय घटक त्यांच्या विभागात उपहासात्मक चर्चेचे विषयही बनले होते. जुईनगर नोडमध्ये एका राजकीय घटकांने शेतातील पंपही अळीनाशक फवारणीसाठी आणल्याचे अनेकांनी जवळून पाहिले होते. सतत गावी ये-जा करणाऱ्या राजकीय घटकांना त्यांच्या विरोधकांमुळे घरीच १४  दिवसाचा  वनवासही सहन करावा लागला. कोरोना  काळात तब्बल वर्षभर निवडणूक लढविण्याच्या एकमेव महत्वाकांक्षेपायी प्रस्थापितांसह इच्छूकांनी आपल्या खिशातून लाखो रूपयांची उधळपट्टीही करावी लागली. ठेकेदारांकडून केलेल्या विकासकामातून मिळालेल्या मिठाईमुळे प्रस्थापितांच्या खिशाला फारशी झळ बसली नसली तरी अन्य इच्छूक घटकांना मात्र कर्ज काढून समाजसेवकाचे चित्र मतदारांसमोर वठवावे लागले आहे.

निवडणूकीच्या मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहिर झाला. प्रस्थापितांसह इच्छूकांनी हरकती घेण्याचा जोरदार कार्यक्रम पार पाडला. मतदार पळवापळवी, ५०० ते १५०० रूपयांपर्यतच्या आरोप-प्रत्यारोपाचा कलगीतुराही भाजपा व  राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये नुकताच पार पडला. आयाराम-गयारामाचे कार्यक्रम सुरूच आहे. मातब्बरांनी दुसऱ्यांच्या प्रभागात अतिक्रमण करून निवडणूक लढविण्याच्या हालचाली अंतिम टप्प्यात आल्या असतानाच पुन्हा एकवार गुडघ्याला बाशिंग बांधून निवडणूक लढवू पाहणाऱ्या प्रस्थापितांसह इच्छूकांच्या वाटचालीत पुन्हा एकवार कोरोना महामारीचे मांजर आडवे आले आहे. राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागात कोरोनाग्रस्तांची आकडेवारी वाढू लागली आहे. निवडणूक लढवू पाहणाऱ्यांकडून आयोजित केले जात असलेले हळदीकुंकवाचे कार्यक्रम कोरोनाला हातभार लावत असल्याचे मत प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून उघडपणे व्यक्त होवू लागले आहे. त्यातच कोरोना  वाढत असल्याने लोकांचे जीवन महत्वाचे आहे, राजकारण नाही, प्रशासकीय काळातही नागरी सुविधा मिळत असल्याने व नागरी समस्यांचे निवारण होत असल्याने निवडणूका लांबणीवर टाकण्याची मागणी आता सर्वसामान्यांकडूनच उघडपणे केली जावू लागली आहे. पुन्हा निवडणूका लांबणीवर पडल्यास जनतेमध्ये टिकून राहण्यासाठी तसेच कोरोना वाढल्यास पुन्हा समाजसेवकांचे रूप वठविण्यासाठी खर्च करायला निधी आणायचा कोठून या विचारानेच आता प्रस्थापितांसह इच्छूकांचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे कोरोना  महामारी आटोक्यात यावी व निवडणूका एप्रिल २०२१मध्ये पार पडाव्यात यासाठी सर्वच राजकीय घटकांनी आपल्या घरातील देवही पाण्यात ठेवले असल्याचे उपहासाने बोलले जावू लागले आहे.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago