Categories: Uncategorized

नवी मुंबईत कोरोनाचा आकडा पुन्हा शंभरीपार

नवी मुंबई : कोरोनाचा उद्रेक कमी होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसतानाच ३० मेचा शनिवार कोरोनाबाबत पुन्हा एकवार नवी मुंबईकरांची चिंता वाढविणारा ठरला आहे. शनिवारी महापालिका प्रशासनाकडून प्रसिध्द करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार ११४ कोरोना रूग्ण नवी मुंबई शहरात आढळले आहेत. याच महिन्यात सोमवार, ११ मे रोजी कोरोनाच्या आकडेवारीने शतकी मजल मारताना १०५ आकडेवारी गाठली होती.
नवी मुंबई शहरात कोरोना आटोक्यात आणण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असले तरी महापालिका प्रशासनाच्या आरोग्य विभागातील डॉक्टर, परिचारिका व अन्य कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झालेली आहे. आरोग्य विभागात कामासाठी आणलेल्या परिवहनच्या तिकिट तपासनीसांनाही कोरोनाची लागण झाली आहे. दोन दिवसापूर्वीच महापालिका मुख्यालयात कार्यरत असणाऱ्या आरोग्य विभागातील दोन क्रमाकांच्या वरिष्ठ डॉक्टरलाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यातच रसायनी येथील इंडियन बुल्स येथे महापालिकेने निर्माण केलेल्या कोरंन्टाईन सेंटर हे कोरोनाग्रस्तांच्या सुविधाऐवजी तेथील असुविधांनीच अधिक वादग्रस्त बनले. उपचारासाठी तेथे आणलेल्या नवी मुंबईकरांना तेथे आंदोलन करण्याची वेळ आली.
आज आढळलेल्या ११४ कोरोना रूग्णांमध्ये बेलापूर विभागात १५, नेरुळ विभागात २२, वाशी विभागात १४, तुर्भे विभागात ४१, कोपरखैराणे विभागात १५, घणसोली विभागात ४, ऐरोली विभागात कोरोनाचे २ तर दिघा विभागात कोरोनाचा एक रूग्ण आढळले आहेत. या कालावधीत महापालिका प्रशासनात कायम सेवेत काम करणाऱ्या एका वाहनचालकाचाही कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. ११ मेनंतर पुन्हा कोरोनाची आकडेवारी शंभरीपार गेलेली आहे.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago