Categories: Uncategorized

नवी मुंबईतून हजारो तरुणांसह महिलांची राज ठाकरेंच्या उपस्थितीत जोरदार ‘इनकमिंग’

सिडको सदनिका सोडत धारकांनी राजसाहेबांचे मानले आभार

डिसेंबर मध्ये नवी मुंबईत मनसेचा मेळावा, राजसाहेबांची घोषणा

नवी मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून मनसेत सुरु असलेला प्रवेशाचा धडाका सुरूच आहे. सोमवारी दादर कृष्णकुंज येथे नवी मुंबईतील विविध पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते, तरुण, महिला यांनी हजारोच्या संख्येने मनसेत राज ठाकरेंच्याहस्ते प्रवेश केला. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सेवा दलचे नवी मुंबई उपजिल्हाध्यक्ष जगन्नाथ दाते, आम आदमी पक्षाचे नवी मुंबई समन्वयक अमित सेठ, जगदंबा प्रतिष्ठान चे अध्यक्ष भरत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस चे बांद्रा जिल्हा उपाध्यक्ष रोहित गोळे, यशोदा किशोर ईशी राष्ट्रवादी काँग्रेस सानपाडा वॉर्ड अध्यक्ष, नवी मुंबई काँग्रेस जिल्हा सचिव मनोज पाटील, नेरुळ मधील काँग्रेस चे वॉर्ड अध्यक्ष नंदू भाऊ गायकवाड, नेरुळ राष्ट्रवादी काँग्रेस महिला तालुका अध्यक्ष वंदना गाडगे, नवी मुंबई श्री २०१८ इब्राहिम बेग, दिवाळे गावातील प्रसिद्ध उद्योजक शाम कोळी, सीवूडसमधील नरेश कुंभार, आकाश खिलारी, पालिका कामगार आणि वाहतूकदारांनी यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी मनसेत राज ठाकरेंच्या हस्ते मनसेत प्रवेश केला.

त्याचप्रमाणे २०१८-१९ मधील सिडको सदनिका सोडत धारकांचे मुद्रांक शुल्क मनसेच्या प्रयत्नामुळे लाखो रुपयांवरून केवळ रुपये एक हजार करण्यात आले. तसेच कोरोना काळात आर्थिक संकटामुळे हप्ते न भरलेल्या १७२० सोडतधारकांचे घर रद्द झाले होते. त्यांना घर घेण्याची पुन्हा एकदा संधी सिडकोने मनसेच्या प्रयत्नामुळे दिली. या सोडतधारकांनी राज ठाकरेंना मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त केले. तसेच राज ठाकरेंप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करणाऱ्या हजारो कार्यकर्त्यांमुळे कृष्णकुंज बाहेरील वातावरण जल्लोषपूर्ण झाले होते. कार्यकर्त्यांनी राजसाहेब ठाकरेंचा विजय असो, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो अशा घोषणांनी कृष्णकुंज परिसर दणाणून सोडला. त्याचप्रमाणे सिडको सोडत धारक मोठ्या संख्येने कृष्णकुंज बाहेर आभार व्यक्त करणारे फलक घेऊन उभे होते. महाराष्ट्र सैनिकांचा उत्साह बघून राज ठाकरेंनी डिसेंबर महिन्यात कोरोनाची परिस्थिती पाहून कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊ अशी घोषणा केली. त्यामुळे नवी मुंबईतील तमाम महाराष्ट्र सैनिकांचा आनंद द्विगुणित झाला.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago