Categories: Uncategorized

नगरसेविका सुजाता पाटलांच्या पाठपुराव्यामुळे सारसोळे – नेरूळ सेक्टर ६ मधील रस्त्यांचे डांबरीकरण

नवी मुंबई : महापालिका प्रभाग ८५च्या उच्चशिक्षित कार्यसम्राट नगरसेविका  सौ. सुजाता सुरज पाटील यांच्या माध्यमातून सारसोळे गाव, नेरूळ सेक्टर सहा व कुकशेत गावात निर्माण झालेली विकासाची गंगा आजही थांबण्यात तयार नाही. सारसोळे गाव व नेरूळ सेक्टर सहामधील कै. कान्हा चाहु म्हात्रे, सारसोळे, सेक्टर ६ (रमेश म्हात्रे यांचे निवासस्थान) येथील रस्त्याच्या डांबरीकरणाचा शुभारंभ झाला.

मागील पावणे सहा वर्षाच्या कालावधीत प्रभाग ८५ मधील सारसोळे व कुकशेत गाव तसेच नेरूळ सेक्टर सहा परिसरात विविध नागरी समस्यांचे निवारण करताना नागरी  सुविधांचा डोंगर  सौ. सुजाता सुरज पाटील यांनी आपल्या नगरसेवक पदाच्या कालावधीत  निर्माण  केला. ११६ नगरसेवकांच्या सभागृहात (पाच स्विकृत धरून) विकासकामे करूनही प्रसिध्दीपासून चार हात जाणिवपूर्वक लांब राहणाऱ्या तसेच सोशल मिडिया न हाताळणाऱ्या सौ. सुजाता  सुरज पाटील या एकमेव नगरसेविका आहेत. ज्या स्थानिक जनतेसाठी कामे करते, त्या जनतेला ही विकासकामे कोणामुळे झाली आहेत, हे माहिती असल्याने प्रसिध्दीसाठी का प्रयत्न करावेत ही कार्यसम्राट नगरसेविका सौ. सुजाता सुरज पाटील यांची  विचारधारणा त्यांनी वेळोवेळी बोलूनही दाखविलेली आहे.

नगरसेविका सौ. सुजाता सुरज पाटील यांच्या नगरसेवक निधीमधुन कै. कान्हा चाहु म्हात्रे मार्ग सारसोळे, सेक्टर ६ ( रमेश म्हात्रे यांचे निवासस्थान) येथील लॅाकडाऊनमुळे राहीलेले रस्त्याचे डांबरीकरणाचे काम करण्यात आले. नवी मुंबईत अन्यत्र निवडणूकांच्या धर्तीवर चमकेश  प्रकारांना उधाण आलेले असताना नगरसेविका सौ. सुजाता सुरज पाटील या आजही प्रसिध्दीपासून लांब  राहत विकासकामांसाठी प्रयत्न करत असल्याचे पुन्हा एकवार नेरूळ  सेक्टर  सहाच्या रहीवाशांना अनुभवयास मिळाले आहे.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago
magbo system