Categories: Uncategorized

तानाजी मालुसरे क्रिडांगणावर गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलाव बनविण्याची मनोज मेहेरची मागणी

नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहा परिसरात महापालिकेच्या तानाजी मालुसरे क्रिडांगणावर गणेश विसर्जनासाठी कृत्रिम  तलाव बनविण्याची मागणी नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी ब प्रभाग समिती सदस्य  आणि सारसोळे गावातील कोलवाणी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष तसेच प्रभाग ८६ मधील स्थानिक भाजपा  नेते मनोज  यशवंत मेहेर यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे लेखी निवेदनातून  केली आहे.

सध्या कोरोना काळ  सुरू आहे. नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोरोनाची आकडेवारी दररोज वाढत असल्याचे आपणास माहिती आहेच. गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर आलेला आहे. नेरूळ  सेक्टर सहा व सारसोळे गावातील घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सवातील गणेश मूर्ती विसर्जनासाठी जुईनगर येथील चिंचोली तलाव व पामबीच मार्गावरील तलावात जात असतात. नेरूळ सेक्टर सहा परिसरात महानगरपालिकेचे तानाजी मालुसरे क्रिडांगण आहे. या क्रिडांगणात गणेश विसर्जनासाठी कृत्रिम  तलाव तातडीने बनविणे आवश्यक आहे.  एका दिवसात कृत्रिम तलावाची निर्मिती करणे सहज  शक्य आहे. ठेकेदारांनी आजवर महापालिकेत कामे करून कोट्यवधी रूपये कमविले आहेत. या मैदानात कृत्रिम  तलाव  बनल्यास नेरूळ  सेक्टर सहा व सारसोळे गावातील घरगुती गणेश व सार्वजनिक गणेशमूर्तीचे विसर्जन येथे करणे शक्य होईल आणि जुईनगर येथील चिंचोली तलावावर तसेच पामबीच तलावावरील  गर्दी कमी होईल, असे प्र्रभाग ८६ मधील  स्थानिक भाजपा  नेते मनोज यशवंत मेहेर यांनी निवेदनात म्हटले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नेरूळ सेक्टर सहा परिसरात महापालिकेच्या तानाजी मालुसरे क्रिडांगणावर गणेश विसर्जनासाठी कृत्रिम  तलाव तातडीने बनविणे आवश्यक आहे. आम्ही आजच नाही तर गेल्या काही वर्षापासून या क्रिडांगणावर गणेशोत्सव पार्श्वभूमीवर कृत्रिम  तलावाची  मागणी  करत आहोत.  आता  कोरोना  टाळण्यासाठी आणि नेरूळ  सेक्टर सहा  व सारसोळे गावातील गणेश मूर्तीचे स्थानिक परिसरात विर्सजन करण्यासाठी लवकरात लवकर तानाजी मालुसरे क्रिडांगणावर कृत्रत्रिम  तलाव बनविण्याचे संबंधितांना  आदेश  देण्याची मागणी प्र्रभाग ८६ मधील  स्थानिक भाजपा  नेते मनोज यशवंत मेहेर यांनी  महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago