Categories: Uncategorized

ठोक मानधनावरील शिक्षकांच्या कायम सेवेसाठी नवी मुंबई इंटकचे शिक्षण मंत्र्यांना साकडे

संदीप खांडगेपाटील : ९८२००९६५७३ – ८३६९९२४६४६

नवी मुंबई : महापालिका प्रशासनाने ठोक मानधनावरील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या कायम सेवेबाबतचा राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविलेल्या प्रस्तावास मंजुरी मिळण्यासाठी  सहकार्य करण्यासाठी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांची भेट घेवून त्यांना साकडे घातले. यावेळी रवींद्र सावंत यांच्यासमवेत महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे  सचिव  संतोष शेट्टी  व  ठोक मानधनावर काम  करणारे  शिक्षकही उपस्थित होते.

नवी मुंबई महापालिका प्रशासनातील शिक्षण विभागात ठोक मानधनावर प्राथमिक शाळांमध्ये १३८ शिक्षक तर माध्यमिक शाळांमध्ये १३६ शिक्षक कार्यरत आहेत. या शिक्षकांच्या कायम सेवेसाठी नवी मुंबई इंटकने सातत्याने महापालिका प्रशासनाकडे व राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. महापालिका आयुक्तांच्या सतत भेटी घेवून, लेखी निवेदने सादर करून ठोक मानधनावरील शिक्षकांच्या कायम सेवेसाठी प्रशासनाकडे आग्रही भूमिका मांडलेली आहे. महापालिका प्रशासनाने संबंधित शिक्षकांच्या कायम सेवेसाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव (माध्यमिक शिक्षकांसाठीचे पत्र : जा.क्रं. नमुंमपा/शि.वि/२२०५/२०२० तर प्राथमिक शिक्षकांसाठीचे पत्र : जा.क्रं. नमुंमपा/शि.वि/२२०६/२०२० )पाठविलेला आहे.  आपण यासंदर्भात इंटकचे प्रतिनिधी, शिक्षक प्रतिनिधी, महापालिका शिक्षण विभाग, राज्य सरकार शिक्षण विभाग यांची आपल्या दालनात संयुक्त बैठक आयोजित करून या प्रकरणाला गती मिळवून द्यावी. प्राथमिक व माध्यमिक शाळांतील संबंधित शिक्षक आपणाबाबत आशावादी आहेत. या प्रस्तावास राज्य सरकारची लवकरात लवकर मंजुरी मिळावी यासाठी आपण व्यक्तिगत पातळीवर प्रयत्न करून नवी मुंबई इंटकला सहकार्य करावे अशी  विनंती  यावेळी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांना  केली.

रवींद्र सावंत यांना सकारात्मक प्रतिसाद देताना शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांनी आगामी जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांच्या दालनात इंटक संघटना व पालिका आयुक्त ,व शिक्षण अधिकारी पालिकेचे यांची संयुक्त बैठक आयोजित करून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago