Categories: Uncategorized

ठाण्याच्या अर्जुन देशपांडे यांच्या जनरीक आधारमध्ये उद्योगपती रतन टाटा भागीदार म्हणून सहभागी

भास्कर गायकवाड : Navimumbailive.com@gmail.com

ठाणे : ठाणे शहरातील अठरा वर्षाचा मुलगा गेली दोन वर्षे जनरीक औषधे स्वस्त दरात वितरित करीत आहे. हे समजल्यावर त्याच्या या उपक्रमात सक्रीय  भागीदार म्हणून सहभागी होण्याचा निर्णय भारताचे प्रसिद्ध  उद्योगपती रतन टाटा यांनी घेतला आहे. अर्जुन  देशपांडे या ठाणेकर युवकाचा हा फार मोठा गौरव आहे. तसेच भारतीयांना स्वस्त दरात औषधे देण्याचे श्री. रतन टाटा यांचे स्वप्न प्रत्यक्षात साकारणारी आहे.

अर्जुन देशपांडे याने वयाच्या १६व्या वर्षी जनरीक आधार या संस्थेची स्थापना केली. तो जनरीक आधारचा संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी झाला. भारतीय  सामान्य माणसाच्या उन्नतीसाठी ठराविक भारतीय फार्मा बिझिनेस साखळीत नाविन्यपूर्ण क्रांती घडवित त्याने भारतातील प्रत्येक शहरात परवडणारी औषधे उपलब्ध करून देण्याचे उद्दीष्ट ठेवले व तसे काम सुरु केले. एकेका मेडिकल स्टोअरला पाठिंबा देत जनरीक आधार औषधे पुरविणारी ही पहिली कंपनी ठरली. अर्जुन देशपांडे यांच्या जनरीक आधारचा या कंपनीला बरीच स्पर्धा होती.

 मोठमोठ्या वैद्यकीय मॉल्स आणि ऑनलाइन फार्मसीमुळे त्याचा वाईट परिणाम झाला आहे. अर्जुन देशपांडे जेनेरिक आधारच्या माध्यमातून. एकेक मेडिकल स्टोअरला  ऑफलाइन + ऑनलाइन मदत करुन व्यवसाय  वाढीसाठी मदत केली. बी २ बी २ सी व्यवसाय मॉडेलमुळे मेडिकल स्टोअर्सना व्यवसाय वाढीसाठी जनरीक आधारचा मोठा आधार मिळाला आहे.                                                    

अवघ्या अठराव्या वर्षात ठाणेकर अर्जुन देशपांडे यांनी परवडणारी औषधे देऊन फार्मा उद्योगात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अजूनही आपले भारतीय लोक अनावश्यक औषधांसाठी मोठी किंमत मोजत आहेत आणि सर्वसामान्यांच्या खांद्यावर त्याचे ओझे पडत आहे. सर्वेक्षणानुसार काही लोक अद्याप ब्रॅन्डेड औषधांच्या अनावश्यक किंमतीमुळे औषधांचा लाभ घेऊ शकत नाहीत. म्हणून अर्जुनने ठरवले की आपण थेट डब्ल्यूएचओ जीएमपी कडून प्रत्येक भारतीयाला परवडणारी व गुणवत्तापूर्ण औषधे मिळू शकतील असा व्यवसाय करु या आणि त्याला चांगले यश आले.

अर्जुन देशपांडे यांच्या महान मिशनमुळे ज्येष्ठ नागरिकांसह, पेन्शनधारकांना सर्वाधिक फायदा होतो आहे.  दरमहा औषध घेत असलेल्या त्यांच्या मासिक बजेटपैकी बरीच बचत होते. याबरोबरच अर्जुनच्या जनरीक  आधार तर्फे दरवर्षी १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी रोजी प्रत्येक मेडिकल स्टोअर्समध्ये विनामूल्य आरोग्य शिबिराचे आयोजन केले जाते.त्याचा लाभ हजारो घेतात.             

उद्योगपती रतन टाटा सर यांना जेव्हा किशोरवयीन मुलगा अर्जुन गेल्या दोन वर्षांपासून भारतीय लोकांसाठी आरोग्य सेवा क्षेत्रात कठोर परिश्रम आणि नवनवीन उपक्रमाबरोबरच जेनेरिक औषधांबद्दल लोकांमध्ये जनजागृती करीत असल्याचे समजले तेव्हा ते खूप प्रभावित झाले.

या चांगल्या व्यवसायासाठी जेव्हा अर्जुनने रतन टाटा सरांचा सन्मान करण्याची त्याच्या जनरीक आधारच्या व्यवसायाची माहिती दिली तेव्हा ते खूप प्रभावित झाले आणि त्यांनी अर्जुनच्या महान मोहिमेचा भाग होण्याचा आणि जनरीक आधार व्यवसायाचे भारतीय बाजारपेठेसाठी संपूर्णपणे भारतीय लोकांकडे जाण्याचे ठरविले. तसेच रतन टाटा सरांचे आपल्या लोकांसाठी परवडणारे आरोग्य सेवा करण्याचे स्वप्न आहे.

रतन टाटा सर यांच्या सहकार्याने लवकरच भारताच्या प्रत्येक शहरात अर्जुन देशपांडे यांच्या जनरीक  आधार सुरू होणार असून स्वत: रतन टाटा उपस्थित राहणार आहे.अर्जुन देशपांडे याला लहान वयात मिळालेला हा बहुमान आहे.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago