Categories: Uncategorized

झाडांच्या फांद्या हटविण्यास भगत परिवार कार्यकर्त्यांसह स्वत: रस्त्यावर उतरला

नवी मुंबई / भास्कर जाधव

जोरदार झालेल्या वाऱ्यामुळे नवी मुंबईत अनेक ठिकाणी झाडांची तसेच झाडांच्या फांद्यांची पडझड झाली. पण पडलेली झाडे व फांद्या हटविण्यासाठी महापालिका प्रशासन व अग्निशमनच्या कर्मचाऱ्यांची वाट न पाहता प्रभाग ९६ मध्ये जनसेवक गणेश भगत व त्यांचा परिवार कार्यकर्त्यासह रस्त्यावर उतरला आणि पडझडीतले अडथळे दूर करत रस्त्यावरील कोंडी हटविल्याने नेरूळ पश्चिममधील रहीवाशांनी जवळून पाहिले.

बुधवार, दि. ३ जुन रोजी झालेल्या जोरदार पाऊस व वाऱ्यामुळे नेरुळ प्रभाग क्रमांक-९६ मध्ये अनेक ठिकाणी झाडे झाडांच्या फांद्या पदपथावर व रस्त्यावर ऊभ्या असलेल्या गाड्यावर पडल्याची माहिती मिळताच स्थानिक नगरसेविका सौ.रुपाली किस्मत भगत यांनी नवी मुंबई महानगरपालिका अग्निशमन विभाग आणि उद्यान विभागास फोन करून सदर ठिकाणावरील पडलेल्या झाडांच्या फांद्या उचलण्याच्या सूचना केल्या,फायरब्रिगेड अधिकारी वर्गाने तत्परतेने नेरुळ सेक्टर-१८ येथील सागरदर्शन टॉवर पदपथालगत उभ्या असलेल्या टॅक्सीवर पडलेली झाडांची फांदी,नेरुळ सेक्टर-१६ येथील श्री विनायक सोसयटी लगत उभ्या असलेल्या वॅग्नर गाडीवर पडलेली झाडांची फांदी, अवधूत सोसायटी मध्ये साई मंदिरावर पडलेली झाडांची फांदी कटिंग करून बाजूला केल्या.

थोड्या वेळात पुन्हा पाऊस व वाऱ्यामुळे सेक्टर-१६ श्री सागर दर्शन सोसायटी आणि सेक्टर-१८ जयभवानी सोसायटी समोरील पदपथ लगत उभ्या असलेल्या गाड्यांवर झाडांच्या फांद्या पडल्या तसेच सेक्टर १६ए आनंद विहार सोसायटी मध्ये मोठे झाड पडले, फायर ब्रिगेड ला संपर्क केला असता ते इतर ठिकाणी कामात व्यस्त असल्याने  नगरसेविका रुपाली किस्मत भगत आणि जनसेवक गणेशदादा भगत यांनी आपले सहकारी वर्गास सूचना करून सदर झाडे व झाडांच्या फांद्या बाजूला करण्याची विंनती केली. मिळालेल्या सूचनेनुसार सामाजिक कार्यकर्ते रविंद्र भगत, विकास तिकोने, अशोक गांडाल,  सागर मोहिते, संग्राम चव्हाण, राजेंद्र तुरे, राजेश घाडी, सत्यवान घाडी, संजय पिंगळे, कुणाल भालेराव, विजय संसारे, विजय पिंगळे, सूर्या पात्रा यांनी स्वतः कोयता आणि कुऱ्हाडीच्या मदतीने सदर ठिकाणावरील पडलेल्या हाडांच्या फांद्या छाटून बाजूला केल्या. या कामगिरीबद्दल स्थानिक नागरिकांनी जनसेवक गणेशदादा भगत, नगरसेविका रुपाली किस्मत भगत, आणि त्यांच्या सर्व सहकारी वर्गाचे आभार मानले.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago