Categories: Uncategorized

जागतिक महिला दिनानिमित्त शनिवारी कुकशेतमध्ये पारिवारिक स्नेह मेळावा

स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com / 9820096573

नवी मुंबई : जागतिक महिला दिनानिमित्त नेरूळ भाजप प्रभाग ८५ व ८६ च्यावतीने कुकशेत गावात पारिवारिक स्नेह मेळावा व हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी, दि. ७ मार्च रोजी कुकशेत गावातील गांवदेवी मैदानावर सांयकाळी ७ वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास ऐरोलीचे आमदार गणेश नाईक, बेलापुरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे,  पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर , उरणचे आमदार महेश बालदी,  नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार, ठाण्याचे माजी खासदार संजीव नाईक, ईशान्य मुंबईचे माजी खासदार संजय पाटील, ऐरोलीचे माजी आमदार संदीप नाईक, नवी मुंबईचे माजी महापौर सागर नाईक, नवी मुंबई भाजपचे अध्यक्ष रामचंद्र घरत, नवी मुंबई महापालिका सभागृगनेते रवींद्र इथापे, नगरसेविका रूपाली भगत, नगरसेविका श्रध्दा गवस, नगरसेवक गिरीश म्हात्रे, माजी नगरसेविका सौ. स्नेहा पालकर, समाजसेवक गणेश भगत यांची या कार्यक्रमास विशेष उपस्थिती राहणार असून सौ. कल्पना संजीव नाईक, सौ. पल्लवी संजय पाटील, सौ. कल्याणी संदीप नाईक, सौ. काजल सागर नाईक, सौ. निर्मला जयवंत सुतार हेही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमामध्ये सरगम या मराठी चित्रपटातील सर्व कलाकार, स्टार प्रवाह वाहिनीवरील श्री. गुरूदेव दत्त मालिकेतील लक्ष्मीफेम जान्हवी किल्लेकर सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात सहभागी महिलांमधून १५ महिलांना सोडतीतून पैठणी साडीची भेट, एलईडी टीव्ही, मोबाईल फोन आदी भेटवस्तूही दिल्या जाणार आहेत.

प्रभाग ८५च्या नगरसेविका सौ. सुजाता पाटील, प्रभाग ८६च्या नगरसेविका सौ. जयश्री ठाकूर, नगरसेवक सुरज पाटील हे या कार्यक्रमाचे आयोजक असून या कार्यक्रमास प्रभाग ८५ व ८६ मधील महिलांनी तसेच रहीवाशांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन नगरसेवक सुरज पाटील यांनी केले आहे.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago