Categories: Uncategorized

घणसोली नागरी आरोग्य केंद्र सुरक्षित ठिकाणी स्थंलातरीत करण्याची रवींद्र सावंतांची मागणी

स्वयंम न्युज ब्युरो : ९८२००९६५७३ : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका प्रशासनाच्या आरोग्य विभागाकडून घणसोली गावामध्ये घणसोली नागरी आरोग्य केंद्र चालविण्यात येत आहे. घणसोली नागरी आरोग्य केंद्राची दुरावस्था झाली असून रूग्णांना उपचार केल्या जाणाऱ्या या नागरी आरोग्य केंद्रात डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार ठेवून वावरावे लागत आहे. चार-पाच दिवसापूर्वी याच नागरी आरोग्य केंद्रात काम करणाऱ्या कंपाऊडरच्या डोक्यात वरून पंखा पडला. हा कंपाऊडर जखमी झाला आहे. या घटनेने नागरी आरोग्य काम करणाऱ्या प्रत्येकाच्या मनात भीती निर्माण झाले आहे. या नागरी आरोग्य केंद्रात काम करण्याची कर्मचाऱ्यांची व अधिकाऱ्यांची मानसिकता नाही. इतरांना उपचार करता करता आपणासही जायबंदी व्हावे लागेल, अशी भीती कर्मचाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाचे कामगार जायबंदी अथवा मयत होण्याची पालिका प्रशासनाने वाट न पाहता तात्काळ घणसोलीतील नागरी आरोग्य केंद्र सुरक्षित ठिकाणी स्थंलातरीत करण्याची लेखी मागणी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे केली आहे.

या नागरी आरोग्य केंद्रात काम करणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या बाबतीत कोणत्याही क्षणी दुर्घटना होण्याची भीती आहे. कामगारांचा उद्रेक झाल्यास व त्यांनी काम करण्यास नकार दिल्यास रूग्णांना उपचार भेटणार नाहीत. दुर्घटना झाल्यास अथवा कामगारांचा उद्रेक झाल्यास त्यास सर्वस्वी नवी मुंबई महापालिका प्रशासन जबाबदार राहील याची आपण नोंद घ्यावी. समस्येचे गांभीर्य पाहता आपण लवकरात लवकर घणसोली नागरी आरोग्य केंद्र एका चांगल्या जागेत स्थंलातरीत करावे.  कामगारांना आरोग्य सुविधा कॅशलेस मिळावी यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत. कामगारांच्या बाबतीत दुर्घटना होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे उपचार करून  बिल पाठवा व नंतर बिलाचे पैसे मिळवण्यासाठी हेलपाटे मारायचे. रूग्ण अॅडमिट असताना घरच्यांनी पैशाची जमवाजमव करण्यासाठी धावपळ करायची, हे कोठेतरी थांबले पाहिजे. रूग्ण दगावतात, मागील महिन्यात एक मुख्याध्यापकांचा मृत्यू झाला. शाळेत येताना अपघात झाला होता. लाखो रूपये खर्च झाला. मुख्याध्यापक रूग्णालयात असताना त्यांचा परिवार पैशाची जमवाजमव करण्यासाठी धावपळ करत होता. हे आता खरोखरीच थांबले पाहिजे. कर्मचारी मयत झाल्यावर आता बिलासाठी नातलगांनी धावपळ करायची का? असा सवाल रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्तांना विचारला आहे.

घणसोलीच नाही तर शिरवणेसह इतरही नागरी आरोग्य केंद्राची अवस्था बिकट आहे. पालिका प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करणे आवश्यक आहे. समस्या गंभीर आहे. योग्य ते निर्देश संबंधितांना द्यावेत, अशी मागणी रवींद्र सावंत यांनी केली आहे.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

4 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

4 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

4 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

4 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

4 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

4 years ago