Categories: Uncategorized

गृहनिर्माण सोसायट्यांना कचऱ्याचे डब्बे द्या : सौ. सुनिता रतन मांडवे

स्वयंम न्युज ब्युरो  : ८३६९९२४६४६  – ९८२००९६५७३

नवी मुंबई : प्रभाग ८७ मधील गृहनिर्माण सोसायट्यांना कचऱ्याचे डब्बे देण्याची मागणी शिवसेनेच्या माजी नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी महापालिका घनकचरा  उपायुक्तांकडे केली आहे.

महापालिका प्रभाग ८७ मध्ये नेरूळ सेक्टर ८ आणि १० या परिसराचा समावेश होत आहे. या परिसरात सिडकोच्या गृहनिर्माण सोसायट्या व माथाडी कामगारांची वसाहत यांचा समावेश होत आहे. हा अल्प तसेच अत्यल्प उत्पन्न गटातील रहीवाशांचा परिसर आहे. महापालिका प्रशासनाकडून गृहनिर्माण  सोसायट्यांना कचऱ्याचे डब्बे वितरीत करण्यात येत असतात. सध्या महापालिका प्रशासनाकडून स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. मागील वर्षी नवी मुंबई शहराचा  देशामध्ये तिसरा क्रमांक आला होता, यावर्षी प्रथम क्रमांक यावा महापालिका प्रशासनाकडून स्वच्छतेवर भर देण्यात येत आहे. गृहनिर्माण सोसायट्यांचे कचरे डब्बे सध्या तुटलेले आहेत. महापालिका प्रशासनाकडून सोसायटीतून रस्त्यावर उभ्या असलेल्या कचरा वाहक वाहनापर्यत ते डब्बे नेताना कचरा पडलेला असतो. त्यामुळे परिसराला बकालपणा येवून सुशोभीकरणाला अडथळे येतात. स्वच्छता अभियानाचे गांभीर्य ओळखून गृहनिर्माण सोसायट्यांना कचऱ्याचे डब्बे वितरीत करण्याची मागणी शिवसेनेच्या माजी नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी महापालिका घनकचरा  उपायुक्तांकडे केली आहे.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago