Categories: Uncategorized

गटारांच्या सफाईतून निघालेला कचरा व मातीचे ढिगारे तात्काळ हटवा : मनोज मेहेर

भास्कर जाधव : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : सारसोळे गाव व नेरूळ सेक्टर सहा परिसरातील गटारांच्या सफाईतून निघालेला कचरा व मातीचे ढिगारे तात्काळ हटविण्याची मागणी सारसोळे गावातील कोलवाणी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज यशवंत मेहेर यांनी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे केली आहे.

सारसोळे गाव व नेरूळ सेक्टर सहा परिसरात पावसाळी पूर्व कामांअंर्तगत महापालिका प्रशासनाने गटारांची सफाई करताना त्यातील माती व गटारात तुंबलेला कचरा काढण्यात आला. त्याबाबत सर्वप्रथम आपले सारसोळेच्या ग्रामस्थांकडून व नेरूळ सेक्टर सहामधील रहीवाशांकडून मनापासून मनोज मेहेर यांनी आभार मानले. सारसोळे गाव व नेरूळ सेक्टर सहा परिसरातील गटारांची सफाई करावी यासाठी मनोज मेहेर यांनी एक महिन्यापूर्वीच महापालिका प्रशासनाला  निवेदनही सादर केले होते. 

महापालिका प्रशासनाने गटारांची सफाई करताना जो गाळ, कचरा बाहेर काढला, त्यालाही आता सहा-सात झाले आहेत. गटारातून बाहेर काढलेला गाळ, कचरा आता सुकला  असून त्याची  दुर्गंधी आता ग्रामस्थांना व रहीवाशांना सहन करावा लागत आहे. सध्या कोरोनाचा  काळ  आहे. आमच्या परिसरात ७ कोरोनाचे रूग्ण सापडले आहे. परिसरातील रहीवाशांत भीतीचे वातावरण आहे. त्यातच या दुर्गंधी पसरल्याने लोकांमध्ये आजार वाढण्याची भीती आहे. ही समस्या दोन दिवसापूर्वीच पालिका नेरूळ विभाग कार्यालयाच्या निदर्शनास आणून देवूनही कचरा  व मातीचे ढिगारे अजूनही हटविण्यात आलेले नाहीत. यामुळे परिसरालाही बकालपणा आलेला असल्याचे मनोज मेहेर यांनी पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे.

लोक नाराज आहेत. कोरोनाच्या भीतीखाली वावरत आहेत. त्यातच आता कचऱ्याच्या सुकलेल्या ढिगाऱ्यामुळे दुर्गंधीचाही सामना करावा लागत आहे. समस्येचे गांभीर्य पाहून आपण पालिकेच्या संबंधित विभागाला सेक्टर सहा परिसरातील व सारसोळे गावातील गटारांच्या बाजूलाच  ठेवलेले मातीचे ढिगारे व कचरा हटविण्याचे आदेश देण्याची मागणी मनोज मेहेर यांनी केली आहे.

मनोज मेहेर यांनी ईमेलच्या माध्यमातून महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे ही तक्रार करताच त्यांनी अवघ्या २५ मिनिटात मनोज मेहेर यांच्या तक्रारीची दखल घेत उपायुक्त टी.पी.पवार यांना या समस्येचे निवारण करण्याचे निर्देश दिले.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago
magbo system