Categories: Uncategorized

खोटे बोलणाऱ्या राजेश टोपेंनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा : गजानन काळे

मुंबई: राज्यातील सर्व जनतेला मोफत उपचाराची सुविधा देणाऱ्या महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत १ लाख २२ हजार कोरोनाबाधितांवर मोफत उपचार करण्यात आले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांना मोठा दिलासा मिळाला आहे, असा दावा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विटरद्वारे केला होता. मात्र राजेश टोपेंच्या या दाव्यावर मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी आक्षेप घेत खोटा दावा करत असल्याचे सांगत थेट त्यांच्या राजीनाम्याचीच मागणी केली आहे.

मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी ट्विट करत राजेश टोपे यांनी केलेला दावा खोटा असल्याचा आरोप केला आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये फसवणूक केली जात असल्याचे गजानन काळे यांनी सांगितले आहे. तसेच गजानन काळे यांनी कोरोनाग्रस्त असलेल्या मित्राच्या मदतीसाठी महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या टोल फ्री क्रमांकावर केलेल्या कॉलची ऑडिओ क्लिप देखील ट्विटरवर शेअर करण्यात आली आहे.

गजानन काळे पुढे म्हणाले की, महात्मा फुले जन आरोग्य योजना ही कोरोना पेशंट व्हेंटिलेटरवर असेल तरच लागू पडते आणि अशा रुग्णांची संख्या एक ते दोन टक्क्यांच्या वर असत नाही. हॉस्पिटलमध्ये देखील चौकशी केल्यास हेच उत्तर दिले जाते की आपला रुग्ण व्हेंटिलेटरवर असेल तरच तुम्हाला ही योजना लागू आहे, असे शेकडो अनुभव राज्यातील जनतेला आले आहेत.

तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या हेल्पलाईन क्रमांकावर (१५५३८८/ १८००२३३२२००) संपर्क केल्यास हीच माहिती मिळते. मग महाराष्ट्रात १ लाख ६४ हजार कोरोनाबाधित रुग्ण संख्या असताना १ लाख २० हजार रुग्णांना या योजनेतून कसा लाभ मिळू शकेल असा प्रश्न गजानन काळे यांनी केला आहे. राजेश टोपे खोटे बोलत आहेत आणि उल्लू बनवत आहेत, त्यासाठी त्यांनी एक तर या १ लाख २० हजार रुग्णांना मोफत उपचार दिल्याचे पुरावे सादर करावेत अथवा महाराष्ट्राची माफी मागून मंत्रीपदावर असताना खोटे बोललो म्हणून राजीनामा द्यावा अशी मागणी देखील गजानन काळे यांनी केली आहे.

तत्पूर्वी, महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून कोरोनाकाळात कर्करोग, ह्रदयविकार, किडनी विकाराच्या तब्बल १ लाख ४१ हजार ५७८ रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले आहेत. तर सर्व रुग्णालयांमध्ये २५ जूनपर्यंत १ लाख ९८५ कोरोनाबाधिंतावर मोफत उपचार करण्यात आले. या काळात खासगी रुग्णालयात १८,२२८ तसेच केंद्र शासनाच्या, रेल्वे आणि संरक्षण विभागाच्या आरोग्य केंद्रात २,७७८ असे एकूण १ लाख २१ हजार ९९१ रुग्णांवर उपचार झाले आहेत. महात्मा फुले जनआरोग्य योजना राज्यातील सामान्य रुग्णांना जीवनदायी ठरत असून मोठ्या खर्चाचे वैद्यकीय उपचार तेही मोफत घेणे या योजनेमुळे शक्य झाल्याचे राजेश टोपेंनी सांगितले होते.

कोरोनाच्या काळात कोरोना रूग्णाची अव्वाच्या सव्वा लूट करणाऱ्या रूग्णालय व्यवस्थापणाला दणका देण्याचे काम मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी गेल्या काही दिवसापासून सुरू केले आहे. अनेकांना अवाजवी बिले आकारून कोरोना रूग्ण व त्यांच्या नातलगांशी अमानुष वागणूक करत भरमसाठ बिले आकारणाऱ्या रूग्णालयांना वठणीवर आणण्याचे गजानन काळे व त्यांच्या मनसैनिकांनी गेल्या काही दिवसांपासून आरंभिले आहे. गजानन काळेंच्या सक्रियपणामुळे कोरोना रूग्णांना खऱ्या अर्थाना दिलासा मिळाल्याचे नवी मुंबईत पहावयास मिळत आहे.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago