Categories: Uncategorized

कोरोना पार्श्वभूमीवर लस नवी मुंबईकरांना मोफत द्या : सौ. सुनिता मांडवे

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६७३

स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : कोरोना पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाकडूनउपलब्ध करून दिल्या जाणारी लस नवी मुंबईकरांना मोफत देण्याची मागणी प्रभाग ८७ मधील शिवसेनेच्या माजी नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.

राज्यात कोरोनाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. कोरोनाच्या पहिल्या टप्प्या कोरोना नियत्रंणात आणण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलेले कार्य उल्लेखनीय व प्रशंसनीय आहे. महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळेच कोरोनाचा उद्रेक महापालिका प्रशासनाने नियत्रंणात आणला आहे. गेल्या काही दिवसापासून कोरोनाची आकडेवारी हळहुळू वाढू लागली आहे. काल कोरोनाग्रस्तांचा आकडा १५१ वर गेला आहे. नवी मुंबई शहरात कोरोना पूर्णपणे संपुष्ठात आणण्यासाठी महापालिका प्रशासनाने पुन्हा एकवार कंबर कसली आहे. नवी मुंबईकरांना खासगी रूग्णालये व दवाखान्यात कोरोनावरील लस देण्याचे निश्चित  केले आहे. ही लस अंदाजे २५० रूपयाला नवी मुंबईकरांना देण्यात येणार आहे. नवी मुंबई ही राज्यातील श्रीमंत महापालिकामध्ये मोडली जाणारी महापालिका आहे. स्वमालकीचे धरण या महापालिकेचे आहे. नवी मुंबईकरांच्या मालमत्ता कर तसेच अन्य माध्यमातून महापालिका प्रशासनाच्या तिजोरीत भर पडत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाकडून नवी मुंबईकरांना दिली जाणारी लस ही मोफत देणे आवश्यक आहे. लस ही पूर्णपणे नि:शुल्क असावी. त्यासाठी नवी मुंबईकरांवर कोणताही आर्थिक भुर्दंड लादला जावू नये ही आमची भूमिका आहे. महापालिका प्रशासनाच्या अडीच हजार कोटीच्या ठेवी आहे. नवी मुंबईकरांच्या आरोग्यासाठी मोफत लस देताना काही कोटी खर्च झाले तरी त्यावर कोणाही नवी मुंबईकराची हरकत नसणार. कोरोनामुळे प्रत्येक घराचे अर्थकारण कोलमडून पडले आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाकडून  देण्यात येत असलेली कोरोना प्रतिबंधक लस नवी मुंबईकरांना पुर्णपणे मोफत द्यावी, अशी मागणी माजी नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी केली आहे.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago