Categories: Uncategorized

कोरोना काळात प्रभाग ९६ मध्ये गणेश भगत यांच्याकडून चौथ्यांदा संपूर्ण प्रभागात धुरीकरण

नवी मुंबई : लॉकडाऊन काळात तसेच  कोरोना  पर्वात सातत्याने जनसेवेत अग्रेसर असतानाही प्रसिध्दीपासून चार हात जाणिवपूर्वक लांब  राहणाऱ्या भाजपाच्या गणेश भगत यांनी प्रभाग ९६ मध्ये पुन्हा धुरीकरण  अभियान राबविले आहे. सलग चार दिवस राबविण्यात आलेल्या अभियानात  प्रभागाचा कानाकोपरा गणेश  भगत यांनी धुरीकरणाच्या माध्यमातून पिंजून काढताना  स्थानिक रहीवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोना काळात संपूर्ण प्रभागात धुरीकरण करून घेण्याची जनसेवक गणेश भगत  यांची ही चौथी वेळ आहे.

धुरीकरणाच्या चौथ्या टप्प्यामध्ये जनसेवक गणेश भगत यांनी प्रभागातील सेक्टर १६, सेक्टर १६ ए, सेक्टर १८, पामबीच लगतचा सर्व्हिस रोड, मार्केट तसेच सार्वजनिक जागी धुरीकरण करून घेतले.  डासांच्या वाढत्या उपद्रवाबाबत स्थानिक रहीवाशांनी जनसेवक गणेश भगत यांनी तात्काळ सर्व प्रभागात, कानाकोपऱ्यात, गृहनिर्माण सोसायट्याच्या अंर्तगत भागात, सार्वजनिक ठिकाणी, गटारे यामध्ये धुरीकरण करून घेतले. यावेळी धुरीकरण अभियानात जनसेवक गणेश भगत यांच्यासमवेत अशोक गांडाळ, विकास  तिकोणे, सागर मोहिते, राजेंद्र तुरे, अशोक पिंगळे, जयेंद्र नागरजी आदी सहभागी झाले होते.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago