Categories: Uncategorized

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राजकारण्यांच्या खिशातून होतेय जंतुनाशक फवारणी

नवी मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू असतानाच नवी मुंबईतील राजकीय घटकही नवी मुंबईकरांसाठी रस्त्यावर उतरल्याचे पहावयास मिळत आहे. महापालिका प्रशासन रस्त्यावर सफाई मोहीम करत असतानाच राजकीय घटक मात्र स्वखर्चाने गृहनिर्माण सोसायट्यांच्या अंर्तगत भागात तसेच घराघरात जावून जंतुनाशक फवारणी करताना दिसून येत आहे.

कोरोनाचा प्रभाव वाढू लागताच नवी मुंबईतील दिघा ते बेलापुरदरम्यानच्या राजकीय घटकांनी, नगरसेवकांनी स्वखर्चाने स्वत:च्या प्रभागातील रहीवाशांना मोफत मास्क व सॅनिटायर्झस मोठ्या संख्येने वितरीत केले आहे. इतर भागाच्या तुलनेत नेरूळ, ऐरोली, तुर्भेमध्ये राजकीय घटकांनी आघाडी घेतली आहे. सिवूड, जुईनगर, वाशी, कोपरखैराणे, घणसोलीतीलही राजकारणी आता रस्त्यावर उतरू लागले आहेत. नवी मुंबईत पोलिस मित्रही आता मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले असून जनतेमध्ये जनजागृती करू लागले आहेत. पालिका प्रशासनाकडून मध्यरात्रीच्या सुमारास नवी मुंबईत अंर्तगत व बाह्य रस्त्यावर धुरीकरण व फवारणी होत असताना नगरसेवक आपल्या प्रभागात स्वत: फिरून फवारणी करून घेत आहेत. प्रभागातील नागरिकांची भाज्यांच्या बाबतीत गैरसोय होवू नये तसेच अवाजवी दराने त्यांना भाज्या खरेदी कराव्या लागू नये म्हणून रवींद्र सावंत यांनी एपीएमसीतून भाजीचा टेम्पो आणून स्थानिक परिसरातील रहीवाशांना खरेदीच्या दरात भाजी विकण्यास सुरूवात केली आहे.

नवी मुंबईत सर्वप्रथम प्रभाग ९६च्या नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत यांनी स्वखर्चाने प्रभागातील घराघरात जावून जंतुनाशक फवारणी केली. त्यापाठोपाठ प्रभाग ८७च्या शिवसेना नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी स्वखर्चाने प्रभागातील घराघरात जावून जंतुनाशक फवारणी केली. कॉंग्रेस नेते व नवी मुंबई इंटक अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी स्वखर्चाने धुरीकरणाच्या मशिन खरेदी केल्या असून नेरूळ व जुईनगर परिसरातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये जावून स्वत: कामगार कामावर ठेवून धुरीकरण करून घेत आहेत.

सोशल मिडियाच्या माध्यमातून नेरूळमधील जंतुनाशक फवारणीची सर्वत्र गवगवा होताच नवी मुंबईतील इतर प्रभागातील रहीवाशांकडून जंतुनाशक फवारणीबाबत विचारणा होवू लागली आहे. अनेक नगरसेवकांनी जंतुनाशक फवारणीविषयी विविध कंपन्यांकडून फवारणीचे कोटेशन मागितले असून एक-दोन दिवसात फवारणीचे काम सुरू होईल. सफाई कामगार दिवसातून दोन वेळा रस्ते सफाईचे काम करत आहेत. मूषक नियत्रंण कामगार अहोरात्र राबत आहेत. कचरा वेचक कामगार व कचरा वाहतुक संकलन कामगार कामावर हजर आहेत. प्रशासनाकडून सोसायटीच्या बाहेर व राजकारण्यांकडून सोसायट्यांच्या आत स्वच्छता अभियान राबविले जात आहे.  पोलिस मित्र सक्रिय झाले आहेत. दुकान व्यावसायिकांच्या दुकानापुढे ग्राहकांसाठी नगरसेवकांकडून पांढरे पट्टे मारले जात आहे. कोरोनाविरोधात नवी मुंबईत पालिका प्रशासनासह राजकारणी, सामाजिक संस्था रस्त्यावर उतरल्याचे दिसून येत आहे.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago