Categories: Uncategorized

कोपरखैराणे सेक्टर १६ मधील गतीरोधकावर पांढरे पट्टे मारण्याची मागणी

समाजसेविका सुनीता देविदास हांडेपाटील यांचा महापालिका आयुक्तांकडे पाठपुरावा

नवी मुंबई : महापालिका प्रभाग ४२ येथील कोपरखैराणे सेक्टर १६ मधील गतीरोधकावर पांढरे पट्टे मारण्याची मागणी समाजसेविका व भाजपच्या कार्यकर्त्या सुनिता देविदास हांडेपाटील यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.

महापालिका प्रभाग ४२ मधील कोपरखैराणे सेक्टर १६ मध्ये अंर्तगत भागातील रस्त्यावर गतीरोधक आहेत. त्या गतीरोधकांवर पांढरे पट्टे नसल्याने अनेकदा अपघातही झाले आहेत. काही दिवसापूर्वीच सेक्टर १६ मधील  प्लॉट क्रमांक ९२ वरील गतीरोधकावर पांढरे पट्टे नसल्याने अपघात झाला होता. गतीरोधकावर पांढरे पट्टे नसल्याने वाहने चालविताना गतीरोधकाचा अंदाज येत नाही. जवळ आल्यावर गतीरोधक समजला तरी वाहन नियत्रंणात आणणे वाहनचालकांना अवघड होवून बसते व  त्यातूनच अपघात घडतात. गतीरोधकाजवळ अपघात होत असल्याने या ठिकाणाहून ये-जा करताना स्थानिक रहीवाशांना जीव मुठीत घेवून वावरावे लागत आहे. या गतीरोधकावर पांढरे पट्टे मारले गेल्यास अपघातांना आळा बसून स्थानिक रहीवाशांनाही दिलासा  मिळेल. समस्या संपुष्ठात आणण्यासाठी संबंधितांना सेक्टर १६ मधील रस्त्यावरील गतीरोधकांवर पांढरे पट्टे मारण्याचे निर्देश देण्याची मागणी समाजसेविका सुनिता देविदास हांडेपाटील यांनी केली आहे.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago
magbo system