Categories: Uncategorized

कोपरखैराणेची मुलुखमैदानी तोफ देविदास हांडेपाटील अनंतात विलिन!

भास्कर जाधव : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : देविदास हांडेपाटील, नवी मुंबई महापालिका प्रभाग क्रमांक ४२ चे भाजपचे नगरसेवक, ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांचे विश्वासू कार्यकर्ते, कडवट अनुयायी, एक तत्वनिष्ठ माणूस, सातत्याने सत्याची कास धरणारा, अन्यायाविरोधात लढणारा, कोपरखैराणे परिसरावर प्रेम करणारा, अशा विविध रूपात नवी मुंबईकरांनी देविदास हांडेपाटील नामक लढवय्याला जवळून पाहिले आहे. कोपरखैरणेतील सिडकोनिर्मित धोकादायक इमारतीचा प्रश्न असो अथवा कोपरखैराणेतील डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्न असो, रस्त्यावर उतरून जनआंदोलन करणारी कोपरखैराणे विभागाची देविदास हांडेपाटील नामक मुलुखमैदानी तोफ अखेर १८ मे रोजी कायमचीच अनंतात विलिन झाली. पहाटेच्या सुमारास हद्द्यविकाराचा तीव्र झटका आला आणि गणेश नाईकांच्या विश्वासू शिलेदारांच्या शृखंलेतील एक तारा कायमचाच निखळला.

कोपरखैराणेतील स्मशानभूमीमध्ये सोमवारी सकाळी देविदास हांडेपाटील यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ऐरोलीचे आमदार लोकनेते गणेश नाईक, ऐरोलीचे माजी आमदार संदीप नाईक, ठाण्याचे माजी खासदार संजीव नाईक, नवी मुंबई महापालिकेचे माजी महापौर सागर नाईक, नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार, नगरसेवक शंकर मोरे, नगरसेवक केशव म्हात्रे, नगरसेवक सुरज पाटील, माजी नगरसेवक रतन मांडवे यांच्यासह अन्य नगरसेवक, मनसेचे शहर पदाधिकारी विलास घोणे, लोकदृष्टी दैनिकाचे संपादक दिनेश पाटील, पत्रकार निलेश पाटील, पत्रकार संजय गुरव, सारसोळे गावातील कोलवानी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज यशवंत मेहेर, सुजित शिंदे, गणेश इंगवले यांच्यासह स्थानिक रहीवाशी उपस्थित होते.

नवी मुंबई महानगरपालिकेत अभ्यासू नगरसेवक अशी देविदास हांडेपाटील यांची प्रतिमा होती. स्थायी समितीत तसेच महासभेत विविध प्रश्नांवर देविदास हांडेपाटील प्रशासनावर आसुड ओढत असत. प्रभागातील विकासकामांबाबत हांडेपाटलांची आग्रही भूमिका व पाठपुरावा प्रशंसनीय होता. २००५ व २०१५ सालच्या सार्वत्रिक निवडणूकीत हांडेपाटील नगरसेवक म्हणून निवडून आले होते. नगरसेवक म्हणून निवडून आल्यावर महापालिका प्रशासनाकडून नगरसेवकांना मानपत्र देण्यात येते. तथापि माझ्या प्रभागातील समस्या पालिका प्रशासन सोडवित नाही, ज्या जनतेने मला निवडून दिले आहे, त्यांना सुविधा पुरविण्यात येत नसतील तर त्या मानपत्राचा स्विकार करण्याचा मला अधिकार नसल्याचे खडसावून सांगत देविदास हांडेपाटील यांनी मानपत्र स्विकारण्यास नकार दिला होता.

कोपरखैरणेतील स्मशानभूमीत देविदास हांडेपाटील यांनी श्रध्दाजंली वाहताना लोकनेते गणेश नाईक म्हणाले की, जुन्नरसारख्या ग्रामीण भागातून येवून नवी मुंबईसारख्या शहरात हांडेपाटील यांनी आपले अस्तित्व निर्माण केले. हांडेपाटलांनी गाडी, घोडा, बंगला नाही बांधला, पण लोकांच्या मनात एक आदराचे कायमस्वरुपी स्थान हांडेपाटील यांनी निर्माण केले. समाजाशी प्रेमाचे नाते हांडेपाटीलने निर्माण केले. कोविडची परिस्थती नसती तर हांडेपाटलांच्या अंत्यविधीला या ठिकाणी हजारोचा जनसमुदाय असता. हांडेपाटील यांच्या जाण्याने त्यांच्या परिवारावर दु;खाची कुऱ्हाड कोसळली आहे. परंतु हांडेपाटील यांनी ज्यांच्या ज्यांच्या मनात स्थान निर्माण केले, त्यांच्यासाठी आजचा हा काळा दिवस आहे. हांडेपाटील यांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली, ती भरून येणे अवघड आहे. हांडेपाटील नेहमीच कडक बोलायचे, पण आतून ते फणसासारखे प्रेमळ होते. हांडेपाटील यांच्या जाण्याने नवी मुंबईची व कोपरखैराणे विभागाची हानी झाली असल्याचे गणेश नाईक यांनी सांगितले.नवी मुंबई परिसरात हांडेपाटील म्हणजे गणेश नाईकांचा विश्वासू माणूस, गणेश नाईकांच्या तत्वावर चालणारा माणूस म्हणजे हांडेपाटील म्हणून हांडेपाटील यांना ओळखले जायचे. हांडेपाटील यांचा दशक्रिया विधी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील उंब्रज नं १ या ठिकाणी पुष्पावती नदीच्या तीरावर रविवार, दि. २४ मे रोजी सकाळी ८.३० वाजता होणार असल्याची माहिती त्यांचे बंधू सुभाष हांडेपाटील यांनी दिली.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago